Jalna District

अतिउत्साह भोवला; रस्त्यावर चा वाढदिवस झाला जेलमध्ये साजरा!

जालना- भीम नगर येथीलअॅलन उर्फ मिकी अल्बर्ट पाटोळे वय 34 यांचा काल वाढदिवस होता .रात्री दहा वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने भिमनगर येथील चौकात मीकी आणि त्याचे काही मित्र जमले आणि हातात तीन फुटाची तलवार घेऊन आनंदोत्सव साजरा करू लागले .भर रस्त्यावर अशाप्रकारची तलवार घेऊन नाचणी कायद्याने गुन्हा आहे .या तलवारी मुळे परिसरामध्ये दहशत पसरण्याची शक्यता होती.

 

या प्रकरणाची माहिती सदर बाजार पोलिसांनी मिळाली आणि माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ ,नितीन काकरवाल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार , इरशाद पटेल मनोहर भुतेकर आदी कर्मचारी भिमनगर कडे रवाना झाले. त्यावेळी अल्फ्रेड पाटोळे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेमध्ये सहा व्यक्ती आळीपाळीने हातात तलवार घेऊन नाचत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे करत असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले ,मात्र पोलिसांनी गौतम बबन गवई 21 आणि मोहम्मद फारुक मोहम्मद इस्माईल 30, राहणार भीमनगर यांना धरून त्यांच्याकडे असलेली दोन धारी तीन फूट आठ सेंटीमीटर ची स्टील ची तलवार ताब्यात घेतली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ऐलान उर्फ मिकी अल्बर्ट पाटोळे वय 34 राहणार भीमनगर यांच्या वाढदिवसानिमित्त हे हे सर्वजण तिथे जमले होते. त्या दोघांसह पोलिसांनी मिकी अल्बर्ट पाटोळे, सिद्धार्थ सुभाष मुळे 22 वर्ष आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यामध्ये गौतम गवई ,मोहम्मद इस्माईल,मिकी पाटोळे, सिद्धार्थ मुळे, या चौघांचा समावेश आहे. तर दोन बालक आहेत .चौघांनाही आज न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ ,पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार, इर्शाद पटेल मनोहर भुतेकर, एस .के. फड यांनी ही कारवाई केली.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button