जगदंबा देवीच्या मंदिरात भाविकांची वाढली गर्दी

वाघरुळ- जालना तालुक्यातील वाघरुळ या गावाच्या डोंगरावर वसलेलं जगदंबा देवीचे मंदिर हे भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. फक्त नवरात्रात नव्हे तर वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी असते. नवरात्रामध्ये येथे मोठी यात्रा भरते मात्र गेल्या दोन वर्षांपासून covid-19 महामारी आल्यामुळे शासनाने या यात्रेवर बंदी घातली होती. आता मंदिरे उघडली आहेत त्यामुळे भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली आहे.
डोंगर माथ्यावर हे मंदिर असल्यामुळे मंदिरा पर्यंत जाताना दोन्ही बाजूने असलेली हिरवीगार झाडी भाविकांना आकर्षित करतात .मंदिराला भव्य परिसर आहे त्यामुळे इथे आराधी आणि गोंधळी या दोघांनाही बसण्यासाठी मोठी जागा आहे. मंदिराचा कारभार विश्वस्तांच्या हाती असल्यामुळे तो सर्वांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थित चालू आहे .दरम्यान उत्पन्नाचं साधन वाढाव म्हणून मंदिराच्या परिसरामध्ये एक मंगल कार्यालय देखील बांधल आहे. इथे येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी मंदिर प्रशासन नेहमीच अग्रेसर आहे ,पिण्याचे पाणी आणि झाडाखाली निवांत बसण्याची व्यवस्था तर केलीच आहे त्यात सोबत या नवरात्रोत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची ही व्यवस्था मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांनी केलेली आहे .जालना आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं हे मंदिर आहे. जालना ते देऊळगाव राजा रस्त्यावर मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर आत मध्ये हे मंदिर आहे .मंदिराच्या पायथ्याशी जाईपर्यंत हे मंदिर दिसत नाही. मंदिरात जाण्यापूर्वी पायथ्याशी असलेल्या हनुमानाचे दर्शनही इथे मिळते. या मंदिराचा जीर्णोद्धार सध्या सुरू आहे.
-edtv news,9422219172