Advertisment
राज्य

वादग्रस्त शिक्षण अधिकारी अशा गरुड यांना हजर करून घेण्यास जीपचा नकार

जालना– जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांना अतिरिक्त पदभार देण्यास जालना जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त असलेल्या अशा गरुड यांच्या वादांच्या यादीमध्ये आणखी एक भर पडली आहे.

जालना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी त्यांच्या कार्यकालात अनेक बेकायदेशीर कामे केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.विनाअनुदानित संस्थेवरील शिक्षकांचे अनुदानित शिक्षकांमध्ये रूपांतर करणे, संस्थाचालकांना हाताशी धरून संस्थेत असलेल्या  गैरकारभार आकडे दुर्लक्ष करणे , या आणि अन्य कारणाने संदर्भात त्या नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत, सर्वसाधारण सभेमध्ये देखील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहून जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी आशा गरुड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची ची परवानगी दिली होती.

 त्यांची विभागीय चौकशी ही सुरू आहे, मात्र अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी लागत असल्यामुळे हे प्रकरण भिजत घोंगडे पडले, त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये हा विषय चर्चेत आला आणि  त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला .मात्र तो देखील दाबून टाकण्यात अशा गरूड यशस्वी झाल्या आणि त्यानंतर त्यांची परभणी येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. परंतु त्यांच्या कार्यकाळातील जालना जिल्हा परिषदेत बाकी असलेली कामे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी पुन्हा जालना जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्याकडील हा पदभार काढून घेऊन त्यांची वर्णी लागावी म्हणून वरिष्ठ स्तरावर हालचाली केल्या. त्याचे फलित म्हणून दिनांक 4 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांना पत्र देऊन आशा गरुड यांच्याकडे जालना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा अशा सूचना दिल्या. या सूचनांचे पत्र मिळताच शिक्षण सहसंचालक महेश पालकर यांनी सहा ऑक्टोबर रोजी आदेश काढले . दिनांक 27 सप्टेंबर2021 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा दिलेला अतिरिक्त पदभार अवर सचिवांच्या पत्रान्वये संपुष्टात आणण्यात आल्याचे सांगितले, आणि या पदाचा पदभार आशा गरुड यांनी तात्काळ घ्यावा असेही सूचित करण्यात आले. या सर्व घटना क्रमानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी अशा गरुड यांनी दिनांक 7 आक्टोबर रोजी जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन आपण या पदाचा पदभार घेण्यासाठी येणार असल्याचे कळविले. हे पत्र दिनांक 8 रोजी जालना जिल्हा परिषदेला प्राप्त झाले त्यानंतर दिनांक नऊ आणि दहा रोजी शासकीय सुट्टी होती परंतु 11 तारीख उजाडताच जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी आशा गरुड यांना उलट टपाली पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, या पदाचा समकक्ष पदावरील कैलास दातखीळ शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे .त्या अनुषंगाने प्रशासकीय सोय लक्षात घेऊन श्री दातखील यांच्याकडे हे काम कायम ठेवण्यात आले आहे. आणि त्या संदर्भात शासनाचे अवर सचिव आणि शिक्षण सहसंचालक यांना कळवले आहे. त्यामुळे शासनाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत कोणतेही कामकाज करु नये. याच पत्राची प्रत प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांना देऊन या संपूर्ण पदाचा कार्यभार आपण पहावा असेही आदेशित करण्यात आले आहे.

हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता आज दिनांक 13 रोजी जालना जिल्हा परिषदेमध्ये परभणीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी येऊन पदभाराविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  कामकाज न करण्याचा लेखी आदेश दिलेला असताना देखील जिल्हा परिषदेमधील माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीवर स्थानापन्न झाल्या. या प्रकारामुळे नेमके कोणत्या अधिकाार्‍याचे ऐकायचे या संभ्रमात या विभागातील कर्मचारी आहेत.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button