बाल विश्व

हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर


जालना
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. म्हणूनच आज मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे .हे आघाडी सरकारचे अपयश आहे .अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक होते. आणि म्हणूनच त्यांनी विधिमंडळात कायदा करून हायकोर्टात देखील तो टिकविला होता. मात्र या आघाडी सरकारला तो टिकविता आला नाही हे या सरकार सोबतच मराठा समाजाचे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले

Related Articles