सण साजरे करताना परंपरेला सामाजिकतेची जोड द्या-सौ. नीलिमा संत
जालना-सण आनंदात जाण्यासाठी काही अशी परंपरा जपल्या पाहिजेत. त्या अगदीच निराधार नाहीत, मात्र त्याला सामाजिकतेची जोड देता आली तर आपला उद्देश सफल होईल. असे मत जिल्हा तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सौ. नीलिमा संत यांनी व्यक्त केले.
महिला कुटुंबाला प्राधान्य देतात त्यामुळे त्यांना कधी- कधी नोकरी सोबत तडजोड करावी लागते, आणि त्या ती आनंदाने करतात. त्यामुळेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये कदाचित महिलांचे प्रमाण कमी असेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.ईडी( इलेक्ट्रॉनिक डिजिटल )न्यूज पोर्टल वर नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस 9 नऊ रणरागिनिंच्या मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. या मुलाखतीमधील नववे पुष्प गुंफताना सौ. संत बोलत होत्या.
शासकीय क्षेत्रात वरिष्ठ पदावरील महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली, मात्र याची कारणेही त्यांनी सांगितली. प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाला प्राधान्य देते आणि ते ती आवडीने देते आणि म्हणूनच आपण करत असलेल्या नोकरीमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये या भावनेतून त्या कधीकधी आपल्या अंगातील शक्तींना बाहेरच येऊ देत नाहीत. त्यासोबत खरेतर महिलेमध्ये नेतृत्व करण्याचे गुण उपजतच आहेत. त्यामुळे ती नोकरी परिवार आणि ताण तणाव या सर्व गोष्टींचा शिवधनुष्य ती लीलया पेलते. तिच्या अंगातील या शक्तीचा फायदा करून घेता आला पाहिजे आणि त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी जर अशा महिलांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर त्यांना सुरक्षा पुरवावी, त्यांच्यासाठीस्वछ स्वच्छतागृहे असावीत आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कार्यालयात आल्यानंतर सक्षम पणे त्यांच्या अंगात असलेल्या शक्तीचा वापर करून घेण्यासाठी त्यांच्या पिल्लांना पाळणाघर किंवा प्ले स्कूल उपलब्ध करून द्यावे. असे झाले तर निश्चितच त्यांची कार्यक्षमता आणखी वाढेल. असा विश्वासही सौ.नीलिमा संत यांनी व्यक्त केला.
आधुनिक काळात सण उत्सव साजरे करण्याच्या परंपरा बदलत आहेत. या योग्य की आयोग्य यासंदर्भात त्या म्हणाल्या की,” हे बदलते स्वरूप योग्य की आयोग्य याचे निकष लावू शकत नाहीत. परंतु त्या-त्या काळाला अनुरूप गोष्टी केल्या पाहिजेत. जे आपल्याला आवडेल ते पुढच्या पिढीला आवडेलच असे नाही, त्यामुळे तरुण पिढीशी मिळतंजुळतं घेऊन आपले विचार त्यांच्यामध्ये रुजवायला हवेत. प्रत्येक क्षेत्रात सुरुवातीला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते, लगेचच उत्पन्न होईल असे नाही. हाच नियम वकिली व्यवसायाला देखील लागू होतो .त्यामुळे या क्षेत्राकडे येणाऱ्या महिलांचा कल कमी आहे. मात्र फक्त वकीलीच हा पर्याय नसून महिलांनी या क्षेत्रातील इतर बाबी जाणून घेऊन न्यायाधीशांच्या क्षेत्रात देखील आपला ठसा उमटविला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आपले गुरुतुल्य वडील हेच पाठीराखे होते ,आता पती आणि मुलं आपले पाठीराखे असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात त्यामुळे पुरुषांनी महिलांसोबत वागताना त्यांनादेखील बरोबरीचे स्थान द्यायला हवं, त्यांचा आदर करून आर्थिक निर्णयांमध्ये त्यांना सामील करून घेतलं तरच समाज पुढे जाईल” असे मतही रणरागिनी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सौ. नीलिमा संत यांनी व्यक्त केले.
– दिलीप पोहनेरकर,edtv news 9422219172
( दिवाळीचे साहित्य किंवा प्रासंगिक लेख,कविता,चारोळी, edtvjalna@gmail वर पाठवावेत.सोबत लेखकाचा एक फोटो आणि समबंधीत लेखाच्या अनुषंगाने एखादा फोटो जोडावा. फाईल ओपन आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये पाठवावी)