एकत्रित कुटुंब पद्धती ठेवून शक्ती वाढवा-उद्योजक रत्नाकर पाडळे
जालना- समाजात विलयाला जात असलेली एकत्रित कुटुंब पद्धती पुन्हा एकदा रुजविण्याची गरज आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीची शक्ती मोठी आहे. या पद्धतीनुसार कुटुंबाबरोबर आपली आणि समाजाची प्रगती करून संघटन ठेवून, शक्ती वाढवा असे आवाहन उद्योजक रत्नाकर पाडळे यांनी केले .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विजयादशमी आणि शस्त्रपूजन या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक समरसता गतिविधि प्रांत मंडळ सदस्य प्रा. डॉ. सोमीनाथ खाडे, जालना शहर संघचालक नितीन अग्रवाल, नगर कार्यवाह रेणुकादास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. पाडळे म्हणाले,” मी एक आदिवासी कुटुंबातील तरुण आहे. कोणतीही शैक्षणिक आणि आर्थिक बाजू भक्कम नव्हती त्यामुळे रोजगाराच्या शोधात जालन्यात आलो. आणि अनेक वर्ष विनोदरॉय कंपनीत काम केल्यानंतर या अनुभवाच्या माध्यमातून 2005 मध्ये पूजा रोटोमॅक ही कंपनी स्थापन केली. पाण्याच्या टाक्या तयार करण्यासाठी लागणारे ढाचे हे या कंपनीत तयार होतात. आणि ते इटली, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, इराण, इजिप्त, अशा दहा देशांमध्ये याची निर्यात केली जाते. याची दखल घेऊन 8 ऑगस्ट 21 ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील कौतुक केले आहे.पुढे बोलताना श्री. पाडळे म्हणाले की तरुणांनी व्यवसाय शोधले पाहिजेत, आणि त्यातून स्वतःसाठी आणि समाजासाठीही रोजगार निर्मिती केली पाहिजे. व्यवसायाला जिद्द आणि चिकाटी ची जोड लावली तर आपण हे सहज करू शकतो असेही ते म्हणाले.
दरम्यान प्राध्यापक खाडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कार्यावर प्रकाश टाकला. विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम डॉ. हेडगेवार यांनी केले .कारण हिंदू समाजासमोर जातीयतेची, गरिबीची, आणि आपापसातील वादामुळे कमी होत जाणारा आत्मविश्वास गमावला असल्याची शक्यता होती. आज तो पुन्हा मिळविण्यासाठी समाजातील भेदभाव नाहीसा करून सर्व हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठीच हे सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजन असल्याचे ते म्हणाले. देशामध्ये 13 कोटी स्वयंसेवक आहेत आणि ते हिंदूंच्या संघटनासाठी निस्वार्थ पद्धतीने काम करतात. कुठेही कोणाचे नाव येत नाही कोणाचीही प्रसिद्धी नाही मात्र केवळ हिंदूंच्या संघटनेसाठी ते काम करत आहेत. समाजातील प्रत्येक समस्येवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ उत्तर आहे. कारण प्रत्येक स्वयंसेवक, समाज माझा आहे असे समजतो असेही ते म्हणाले.
-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172
(दिवाळी साठी लेख,कविता,आणि अन्य साहित्य edtvjalna@gmail. com वर ओपन आणि पीडीएफ फाईल मध्ये छायाचित्रासहप पाठवावे.