मत्स्योदरी देवीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…

जालना-अंबड तालुक्याच्या ग्रामदैवत सोबतच महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून मत्स्योदरी देवी प्रसिद्ध आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या या देवीची यात्रा भरली नाही त्यामुळे निश्चितच यावर्षी मागील दोन वर्षांची कसर भरून निघेल आणि यात्रेला गर्दी होईल अशी अपेक्षा होती .मात्र झाले उलटेच दरवर्षी सुमारे दहा ते बारा लाख भाविक नवरात्र मध्ये देवीचे दर्शन घेतात आणि यथाशक्ती आपले दान देवीच्या पेटीत टाकतात त्यानुसार आत्तापर्यंत सर्वात जास्त दान हे सन 2019 मध्ये 3 लाख 96 हजार एवढेमिळाले होते, आणि 10 लाख भाविकांनी दर्शन घेतलं होतं, मात्र या वर्षी हे उलट झालं आहे. नवरात्र मध्ये सुमारे सहा लाख भाविकांनी दर्शन घेतला आहे आणि दानपेटीत पाच लाख 96 हजार 690 रुपये जमा झाले आहेत. त्यामध्ये त्यामध्ये पाच लाख 72 हजार दोनशे वीस रुपयांच्या नोटा आणि 24 हजार 470 रुपयांची नाणी याचा समावेश आहे.
याच सोबत भाविकांनी देवीला सहा लहान सोन्याचे मंगळसूत्र देखील अर्पण केलेले आहेत. तसेच सात मनी, चांदीचे9 ठोकळे,2 पंजे, 8 डोळे, 2 रिंग, आणि एक दात याचाही समावेश आहे. अंबड चे तहसीलदार तथा संस्थान चे पदसिद्ध अध्यक्ष विद्याचरण कवडकर यांच्या उपस्थितीमध्ये आज दानपेटी फोडून या पैशाची मोजणी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार तथा पदसिद्ध सचिव बि.के. चंडोल ,मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, मंदिराचे व्यवस्थापक कैलास शिंदे, विश्वस्त बाळासाहेब कटारे, वसंतराव बल्लाळ, जाधव, गोविंद कायस्थ, दुर्गेश धुमाळ, व इतर सुमारे 20 भाविक उपस्थित होते.
*साहित्यिकांना आवाहन*
जालना जिल्ह्यात प्रथमच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दीपावली अंकाचे साहित्य प्रकाशित करण्याची संधी ई. डी. टीव्ही (इलेक्ट्रॉनिक डिजिटल) न्यूज पोर्टल च्य माध्यमातून उपलब्ध होत आहे. साहित्यिकांनी आपले लेख, कविता, व्यंगचित्र,चारोळी हे edtvjalna@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत .सोबत स्वतःचे छायाचित्रही जोडावे. साहित्य पाठविताना ते स्वतःचेच असावे.)
-दिलीप पोहनेरकर, edtv news ,9422119172