Advertisment
बाल विश्व

आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी


जालना
आजीबाईंच वय 70,सिटीस्कॅन चा स्कोर 25 पैकी 25. असे असतानाही आजीबाईंनी आज कोरणा वर मात करत सामान्य रुग्णालयातून घरी जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला. कौतुकाची बाब म्हणजे नातेवाईकांनीही धीर सोडला होता अशा परिस्थितीमध्ये यवतमाळच्या या आजीबाईंना गेल्या चौदा दिवसांपासून जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या आज ठणठणीत बऱ्या झाल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, सहाय्यक जिल्हा शकेल शल्यचिकित्सक डॉक्टर पद्मजा सराफ, आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज या आजीबाईंना रुग्णालयातून निरोप दिला.
*व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा* https://youtu.be/dikH8ziWCdU

पाच च्या पुढे स्कोर गेल्यानंतर सामान्य माणूस घाबरून जात आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील आजीबाईचा स्कोर पंचवीस असतानाही त्या ठणठणीत बऱ्या झाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी केलेल्या प्रयत्नांला यश आल्याबद्दल आनंद दिसत होता.
सर्वांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवून या आजीबाईंना आज पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button