अतिवृष्टी साठी शासनाची मदत जाहीर, जिल्ह्याला मिळणार सहाशे कोटी रुपये

जालना- अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान आणि घरांच्या झालेल्या पडझडीची मदत म्हणून राज्याकडे 600 कोटींची मदत मागितली आहे, आणि ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी ही झाली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी आपद्ग्रस्तांना ही मदत मिळू शकेलआशिमहिती जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात माहिती देताना श्री टोपे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पाच लाख 16 हजार हेक्टर पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे .अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व आपत्तीची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषानुसार सुमारे चारशे कोटींची रक्कम होते .तुर्तास जिल्हा प्रशासनाने राज्याकडे सहाशे कोटींचा निधी मागितला आहे, आणि तो दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता आहे.
* अशी मिळेल अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत*
दहा हजार रुपये प्रति हेक्टर जिराईत शेती साठी. पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर बागायत शेती साठी. तर 25 हजार रुपये प्रति हेक्टर फळबाग शेतीसाठी मदत मिळणार आहे.
– दिलीप पोहनेरकर ,edtv news,9422219172