भिक्कू संघाचा वर्षावास
जालना- शहरातील इंदेवाडी परिसरात असलेल्या संघर्ष नगर मध्ये भिक्कू संघाचा वर्षावासाचा कार्यक्रम आज पार पडला. भंते बोधीशील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत धम्मचारी अरुणबोधी आणि हर्षरत्न,शशिमनी यांची देखील उपस्थिती होती.
गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भिकू संघ फिरायचे, परंतु पावसाळ्यामध्ये त्यांना होत असलेला त्रास लक्षात घेता एकाच ठिकाणी राहून संघाच्या प्रचार करण्याची प्रथा पडली आणि ती आजही कायम आहे. त्यानुसार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एक ठिकाणी राहूनच हा प्रचार केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून संघर्ष नगर मधील महिलांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे वाचन केले. आज कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित असलेल्या महिलांपैकी सिंधुबाई वाघ यांनी काही भीमगीतेही सादर केली. 20 जुलै पासून सुरु झालेल्या या वाचनाच्या कार्यक्रमाचा आज समारोप झाला. या समारोपाच्या वेळी फकीरा वाघ, एड. बी.एम. साळवे, रमेश डोळसे, राजकुमार सुरडकर, देविदास वाघ, सिंधुबाई वाघ, कौशल्या डोळसे, कविता दाभाडे, रजनी खंडागळे, यांच्यासह परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान या कार्यक्रमापूर्वी परिसरामध्ये मिरवणूक काढून धम्म ध्वजारोहन करण्यात आले होते.
*दिलीप पोहनेरकर*
edtv news,9422219172