विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी वाचविले पाडसाचे प्राण

जालना-मौजे सारवाडी तालुका जिल्हा जालना येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक वन्यजीव छायाचित्रकार निसर्ग अभ्यासक प्राणीमित्र ज्ञानेश्वर गिराम यांच्या विद्यार्थ्याने आणि पालकांनी वाचवले हरिणाच्या पाडसाचे प्राण.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथील विद्यार्थी अरुण जनार्धन काळे आणि करण जनार्धन काळे या दोघा भावंडांनी एका हरणाच्या पाडसाला कुत्र्याने पकडले असता त्याचा आवाज ऐकून तिकडे काही लोक धावले हेसुद्धा तिथपर्यंत गेले परंतु काही लोकांनी वन्यजीव कायद्याच्या भीतीने सदरील पाडसाला हात लावण्यास नकार दिला परंतु दोन्ही विद्यार्थी हे वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांचे विद्यार्थी असल्याने त्यांनी त्यांच्या सरपंच वडील जनार्दन काळे यांना कळवले त्यांनी त्या हरणाचे प्राण त्या कुत्र्याच्या तावडीतून वाचवले व त्या जखमी हरणाच्या पाडसा वर प्रथमोपचार करून तात्काळ आपल्या शिक्षकाना संपर्क केला त्यांनी देखील वन विभागाशी संपर्क साधून या जखमी पाडसाला स्वतः शिक्षक पालक विद्यार्थी यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिले आणि त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.
*दिलीप पोहनेरकर*
edtv news,9422219172