राज्य

पुणे जिल्ह्यात जबरी चोरी ! दोन कोटीचे सोने आणि रोख 31 लाख दरोडेखोरांनी पळवले

पुणे- जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भर दिवसा जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रवेश करत पाच बंदूकधारी चोरट्यांनी तब्बल दोन कोटीचे किमतीचे सोने आणि रोख 30 लाख रुपये चोरून नेले. भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या सियाज मधून पाच दरोडेखोर खाली उतरले. चेहऱ्यावर मास घातलेल्या अवस्थेत त्यांनी बँकेत प्रवेश केला. आणि बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत आणि हाताने मारहाण करत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे सोने आणि 30 लाख रुपये लंपास केले. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पिंपरखेडच येथे आज दिनाक २१ ऑक्टोबर दुपारी दिड वाजता तोंड बांधलेले पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन महाराष्ट्र बँकेत घुसले. यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताने मारहाण करुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि लॉकर मधील सर्व २ कोटी चे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम पोत्यात भरून चार चाकी कार ने पिंपरखेड गावातून वेगात गाडी घेऊन पसार झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. शिरूर जिल्ह्याच्या चारी बाजूने पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे जबरी चोरी झाल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles