Jalna District

शिक्षक कमलाकर तोंडारे यांना जीवन गौरव पुरस्कार

जालना – येथील उपक्रमशील शिक्षक कमलाकर नारायण तोंडारे यांची राज्यस्तरीय “जीवन गौरव पुरस्कार 2021” साठी निवड झाली आहे. भाग्यनगर परिसरात असलेल्या सुरेखा प्राथमिक शाळेत ते शिक्षक आहेत.

त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी बुलडाणा येथील उडान फाउंडेशनने या पुरस्काराची घोषणा केली, यासंदर्भातील अधिकृत पत्र फाउंडेशनचे अध्यक्ष रिझवान शेख आणि सचिव विशाल गुजर यांनी दिले आहे . पुरस्काराचे वितरण दि. 14 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे होणार आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वर्षा सहानी, सचिव श्रीमती उषा देशपांडे, यांच्यासह शाळेतील शिक्षक सविता कुलकर्णी ,नागेश पिंपरकर, मंजुषा भावठाणकर, मारोतराव कानलोड, रवींद्र देशपांडे ,सुरेखा कुलकर्णी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
-दिलीप पोहनेरकर,edtv news,
9422219172

Related Articles