मंदिरावरील हल्ल्यांचा हिंदू संघटनांकडून मोर्चा काढून निषेध

जालना -बांगलादेशात 16 ऑक्टोबरला इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला करून तीन भक्तांची हत्या करण्यात आली, चौथ्या भक्ताचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला, आणि अनेक मंदिराची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज शनिवार दिनांक 23 रोजी इस्कॉनच्या पुढाकारातून सर्वच हिंदुधर्माच्या संस्थांनी भजन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांना निवेदन दिले आहे.
आज या निषेध मोर्चा मध्ये बजरंग दल ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ,महानुभाव पंथ, दत्त पंथ, आणि अन्यही हिंदूंच्या सर्व संस्था सहभागी झाल्या होत्या.
घडलेल्या घटने विषयी इस्कॉन चे व्यवस्थापक गोविंददास यांनी सविस्तर माहिती दिली. त्याच सोबत पुढील काळामध्ये इस्कॉन तीन ध्येय समोर ठेवून काम करणार असल्याचेही ते म्हणाले.
त्यापैकी पहिले ध्येय म्हणजे जिल्ह्यातील सर्व खेड्यांमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरात श्रीमद्भगवद्गीता पोहोचविणे. दुसरे कार्य म्हणजे हिंदूंच्या प्रत्येक तरुणीला आणि महिलेला स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे, हे कार्यदेखील इस्कॉनचे सेवेकरी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पूर्ण करणार आहेत. आणि तिसरे महत्त्वाचे म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये हिंदूंच्या जीवन पद्धतीची अनेक केंद्र बनले आहेत ,या सर्व केंद्रांना पंथांना एकत्र घेऊन मंदिर हेच एकमेव केंद्र आहे, त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित घेऊन काम केले जाणार आहे.
आजच्या या मोर्चामध्ये किशोर तिवारी, डॉ. काबरा, सिद्धिविनायक मुळे, धनसिंग सूर्यवंशी, वेणुगोपाल झंवर ,आदींची उपस्थिती होती.
-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172