मराठवाडा

सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन


जालना कोरोना आजाराला सुरुवात झाली आणि सामान्य रुग्णालयात रुग्ण संख्याही वाढली. त्यानुसार आरोग्य विभागाने कंत्राटी पद्धतीवर डॉक्टरांपासून सफाई कामगारांना पर्यंत सर्व पदांची भरती केली. फेब्रुवारी 2021 मध्ये एक महिना या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. त्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढायला लागली आणि या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले.

कामावर घेतल्यापासून या कर्मचाऱ्यांना सुट्टीच मिळाली नाही. ज्यांनी सुट्टी घेतली त्यांचे तेवढ्या दिवसाचे मानधन कपात केले गेले. आणि जे मानधन आहे ते देखील तुटपुंजे आणि वेळेवर न मिळणारे आहे. या सर्व पिळवणुकीला कर्मचारी तर वैतागले आहेत मात्र कुठे कामही मिळत नसल्यामुळे बळजबरीने इथे काम करत आहेत याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये आणि या कर्मचाऱ्यांनी सक्षम पणे काम करावे यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे ही प्रमुख गरज लक्षात घेऊन याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर परमेश्वर निकस यांनी आज यास हॉस्पिटल च्या प्रवेशद्वारात ठिय्या दिला.
दरम्यान या डॉक्टरला इतर कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता होती. आणि गर्दीही वाढत होती. त्यामुळे पोलिसांना बोलावून डॉक्टरला रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काढले. तरीदेखील गर्दी हटायला तयार नव्हती त्यामुळे पोलिसांनी या डॉक्टरला ठाण्यामध्ये नेऊन नोटीस बजावून सोडून दिले आहे. परिचारिकांना 19800 तर स्वच्छता कर्मचारी आणि वार्ड बॉय यांना केवळ दहा हजाराच्या जवळपास मानधन आहे. त्यामुळे यांना इतर ठिकाणीही काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही या डॉक्टरांनी सांगितले.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button