ढेपाळलेल्या पोलीस यंत्रणेची महा संचालकांकडून माहिती घेणार-डॉ. नीलम गोऱ्हे
जालना- जिल्ह्यातील ढेपाळलेल्या पोलिस यंत्रणेसंदर्भात आपण पोलीस महासंचालकांकडून माहिती घेऊ, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जालन्यात दिली. जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्या उत्तर देत होत्या.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीला पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर ,उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान या बैठकीमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस प्रशासनाला विविध सूचना दिल्या. त्यामध्ये हरवलेल्या मुलींचा शोध प्राधान्याने घेणे, त्यासोबत कोविडमुळे बंद पडलेली महिला दक्षता समितीची बैठक पुन्हा कायम करणे, आणि महिन्यातून एक वेळा ऑफलाईन आणि एक वेळा ऑनलाईन बैठका घेण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत .त्यासोबत कामगार कार्यालय संदर्भात नाराजीही त्यांनी व्यक्त केली. आजच्या बैठकीमध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर कसा भर देता येईल या विषयावर त्यांनी जास्त चर्चा केली. जालना जिल्ह्यात जी गावे कोरोना मुक्त झाली आहेत अशा गावच्या महिलांशी त्यांनी संपर्क संवाद साधला. तसेच कोराना मध्ये ज्या महिलांनी पती गमावले आहेत, मुलांनी वडील गमावलेले आहेत अशा सर्वांना मदत पोहोचली का नाही याविषयी देखील आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना देण्यात येणाऱ्या मदती संदर्भात आवर्जून चौकशी केली, तसेच घरगुती कारणांमुळे स्त्रियांचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे ते वाढविण्यासाठी देखील जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या
-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172