दोन हजाराच्या लाचेत दोघेजण वाटेकरी; एक सरकारी तर एक दलाल

जालना-आदिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून आणि त्याच्या सोबत एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहात पकडले .
या प्रकरणातील तक्रारदाराच्या मुलाच्या नावाने भिल्ल जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार पुढील माहिती घेण्यासाठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी तक्रारदाराने जितेंद्र शिंदे या अव्वल कारकूनाकडे अर्जावरील पुढील कारवाई विषयी विचारणा केली. त्या वेळी शिंदे यांनी गुलाब मोरे या दलालामार्फत तक्रारदाराकडे स्वतःसाठी 1हजार आणि मोरे साठी एक हजार अशा दोन हजार रुपयांची गुलाब मोरे मार्फत मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली आणि आज दोन हजार रुपयांची लाच घेताना पंचा समक्ष या दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जितेंद्र शिंदे राहणार प्रयाग नगर जुना जालना, आणि भिलपुरी येथे मजुरी करणारे गुलाब मोरे या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे ,आणि गुन्हा नोंदविण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
या विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस .शेख आणि त्यांचे सहकारी ज्ञानदेव जुंबड ,मनोहर खंडागळे, गणेश चेके, शिवाजी मस्के, गणेश बुजाडे यांनी ही कारवाई केली.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172