विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या उपप्राचार्या वर कारवाई करा- अभाविप
जालना-महाविद्यालय सुरू होऊन सातच दिवस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीलाच महाविद्यालयाच्या उपप्राचार्यानी विद्यार्थिनिसोबत व्हाट्सअप द्वारे अश्लील मेसेज केल्याचा आरोप j.e.s. महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय पगारे यांच्या वर आहे .त्यानुसार त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांना जामिनावर सोडले आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता महाविद्यालय प्रशासनाने आणि प्राचार्यांनी विजय पगारे यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आंदोलन छेडेल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दिला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बजाज यांना आज सकाळी या विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. यावेळी शहर मंत्री समाधान कुबेर, शहर सहमंत्री ऋषिकेश राऊत, शिवानी भुतेकर, दर्शना पाटील, यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,942221917