विद्यार्थिनीची छेड: घटनास्थळाचा पंचनामा
जालना- शहरातील नामांकित महाविद्यालयात पैकी एक असलेल्या j.e.s. महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय पगारे यांनी एका विद्यार्थिनीला व्हाट्सअप द्वारे काही संदेश पाठवले होते. विद्यार्थिनीची छेड काढणारे असे हे संदेश असल्यामुळे विद्यार्थिनीच्या भावाने सदर बाजार पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंदविला होता.
त्या अनुषंगाने पोलिसांनी 25 तारखेला या उपप्राचार्या ला ताब्यात घेऊन काल दिनांक 26 रोजी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सखोल चौकशी केल्यानंतर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. बी. भताने हे करीत आहेत. या तपासाच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या j.e.s. महाविद्यालयातील विजय पगारे यांच्या केबिनची आज पोलिसांनी पाहणी केली. यावेळी विद्यार्थिनीचा तक्रारदार भाऊ हा देखील तिथे उपस्थित होता. दरम्यान आजच्या या पोलीस कारवाईसाठी सरकारी पंच म्हणून अशोक गुहाडे आणि नारायण माहोरे हे दोन शिक्षक उपस्थित होते, तर पोलिस प्रशासनातील महिला कॉन्स्टेबल श्रीमती केदार, श्रीमती ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप करतारे यांचीही उपस्थिती होती.
या महाविद्यालयात झालेल्या गैरप्रकार मुळे येथील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे, आणि अशा प्रकारच्या नामांकित महाविद्यालयात हा प्रकार घडल्यामुळे अन्य प्राध्यापकांवर ही याचा परिणाम होत आहे. दरम्यान या उपप्राचार्यावर व्यवस्थापन मंडळ पुढे काय कारवाई करणार याबाबतीत मात्र प्राचार्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले .परंतु 25 तारखेला दिवसभर कार्यालयात उपस्थितीनंतर 26 तारखेची एक दिवसाची अर्जित रजा आज प्राचार्यांकडे आलेली आहे. आणि कदाचित यापुढे वैद्यकीय रजा टाकून विजय पगारे हे गैरहजर राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. जोपर्यंत ते महाविद्यालयात रुजू होत नाहीत तोपर्यंत पुढील कार्यवाही होण्याची शक्यता कमीच आहे
– दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172