जालना जिल्हा

युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

जालना
जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील बद्री कल्याण घनगाव या युवकाने दावलवाडी ते सेलगाव दरम्यान एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्रकार 8 मे रोजी सकाळी उघडकीस आला.त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
बद्री घनगाव हा युवक 7 मे पासून मोटारसायकल घेऊन डोंगरगाव येथून बेपत्ता होता,नातेवाईकांनी चोहीकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही. दरम्यान 8 मे रोजी सेलगाव ते दावलवाडी दरम्यान एका शेतात सदरील युवकाचा मृत्यूदेह झाडाला लटकलेला आढळून आला असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
बद्री चे सात वर्षांपूर्वी लग्न झालेले असून एक मुलगा व एक मुलगी आहे असे समजते,घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button