दिवाळी अंकराज्य

सृष्टी पहावी वाटावी म्हणून “सृष्टी फाउंडेशन”

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचा सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केली गेली. त्याचा उद्देश देशाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मजबुत बनवणे आणि इतर प्रगत देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळवून देणे हे होते .त्यानंतर औद्योगिक विकास मंडळाची स्थापना झाली.

अनेक आघाडीवर भारताने प्रगती केली. 1990 चे साल उघडले डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जागतिकीकरणाचे वारे सर्वत्र वाहत असताना भारत त्यापासून अलिप्त राहू शकला नाही. भारताने सुद्धा जागतिकीकरण स्वीकारले आणि तेव्हापासून आज पर्यंत पर्यावरणावर त्याचे कसे आणि किती परिणाम झाले हे पाहणे उचित ठरेल. जागतिकीकरणानंतर अनेक क्षेत्राची वाढ झाली ती एकांगी होती. शेतीचा पाया भक्कम झाल्यावर उद्योग-धंद्यात मध्ये वाढ होणे आणि उद्योगधंद्याचा पाया भक्कम झाल्यावर सेवा क्षेत्राचा वाढीला वेग घेणे नैसर्गिक रित्या सुदृढ प्रक्रिया असते. अनेक पाश्चिमात्य राष्ट्रात बऱ्याच प्रमाणात अशा तऱ्हेने वाढ झाली. 1990 ते 2018 पर्यंत चा विचार केला तर या काळात औद्योगिकीकरणात बेहिशोबी वाढ झाली. रस्ते चौतर्फा झाले. प्रत्येक मोठ्या शहराचा काही भाग एमआयडीसीसाठी राखीव ठेवला जाऊ लागला. परंतु पर्यावरणाचा प्रश्न हळूहळू गंभीर होत जात असताना आपण मात्र याकडे दुर्लक्ष करीत गेलो. रोज कुठेतरी वादळ, पूर, दुष्काळ, सुनामी, जंगलाला आग वगैरे बातम्या येऊ लागल्या. ऋतू मध्ये प्रचंड प्रमाणात होत असलेला बदल जाणवू लागला. अनेक मोठ्या शहरात मास्क शिवाय चालणे अशक्य होऊ लागले. जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरे भारतात आहेत.

एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंटेक्स रिपोर्ट सांगतो की हवा प्रदूषणा मध्ये दर दोन मिनिटांनी एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. श्वसन, हृदय, फुफुसाचे विकार वाढत आहे. प्रदूषणामुळे नैराश्य, आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे पूर, वादळ, दुष्काळ यामुळे लाखो लोक विस्थापित होतात. उद्योगधंद्याच्या वाढीसाठी बेसुमार जंगलतोड झाली पण औद्योगिक वसाहत वाले यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम मान्यच करत नाही. कारण त्यांच्या नफ्यावर घाला घातला जाईल अशी त्यांना भीती वाटते.

2050 पर्यंत1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान वाढ झाली तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे. या ठिकाणी पृथ्वीच्या आणि माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक ऊर्जेचा वापर करणे, जीवाश्म इंधनाचा वापर थांबवणे किंवा खूप कमी करणे, तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण सुधारणे अशा गोष्टी आपण आत्ताच आणि लगेच मोठ्या प्रमाणावर केल्या तर मात्र कदाचित थोडा फरक पडेल. आपली वसुंधरा पूर्वीइतकीच सुजलाम, सुफलाम आणि जैवविविधतेने संपन्न राहील. यासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजे. लोकल टू ग्लोबल पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे आपले सर्वांचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे.

                    लेखिकेचा परिचय

डॉ.प्रतिभा कृष्णा श्रीपत उपमुख्याध्यापिका-श्री म.स्था.जैन विद्यालय, जालना.
2015 मध्ये सृष्टी फाउंडेशनची स्थापना केली.2015 ते 2018 पर्यंत संस्थापिका अध्यक्ष होत्या. पर्यावरण विशेष कार्य केले. शाडूच्या गणेशमूर्ती तयार करणे, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेणे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान स्वरूपात स्वीकारणे , संकलन करणे, खत तयार करणे, जिल्ह्यात रोटी बँकेची स्थापना करणे, मोबाईल टॉयलेट ची निर्मिती लवकरच करणार आहे. कॉलनी निहाय कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन करणे.या वर देखील काम सुरू आहे.

                         +91 78753 28089

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button