दिवाळी अंकराज्य

स्वप्नांची दुनिया- आरती जोशी

अंतःकरणातील भाव भावनांचा उत्कट शब्दातीत अविष्कार उस्फूर्तपणे जेव्हा येतो तेव्हाच ‘कविता’ जन्म घेते. अशा निर्मितीच्या शब्दकळा जाणिव- नेणीवेच्या पातळीवर कवी अनुभवत असतो… कवी त्याची कविता आणि कवितेचा भवताल साहित्याचा विषय होतो..अशा कवितेच्या प्रांतात उपक्रमशील शिक्षिका आरती जोशी यांची कविता नवी वाट शोधू पाहत आहे…’स्वप्नांची दुनिया ‘ या कवितेतून शोध आहे तो, पडलेल्या स्वप्नांचा आणि पूर्ण करण्यासाठीच्या प्रयत्नांचा..कवयित्री जोशी यांची कविता स्वप्नांतून वास्तवाकडे घेवून जाणारी आहे..पहिल्या सदरात कवितेचा रसिकतेने अर्थ समजावून घेवूया..
स्वप्नांची दुनिया
स्वप्न नयनी रम्य पहाट
रंग भरले ,गगनी स्पर्श
भान हरपून झाले दंग
मनी मानसी उत्साह हर्ष
पूर्ण करू  यत्न नियमित
पाऊल चाले,वाट अभेद्य
उत्तुंग भरारी असे नित्य
नको निराशा असावी जिद्द
उंच शिखरे, डोंगर रांगा
आकाश निरभ्र, डोईवर
पाखरे येती, धुंद होऊन
बोध देऊन स्वप्न सागर
दुनिया ही स्वप्नांची लकेर
ओढून झालर भावनांची
साद घालते,भाव निर्मल
हिरवी निळी, फुले सृष्टीची
                 आरती जोशी ,जालना
                +91 88304 76187
दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button