Advertisment
Jalna District

कौशल्य दाखवा स्कॉलरशिप मिळवा; आर्थिक अडचणीमुळे सोडू नका शिक्षण

 जालना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जालन्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अकरावी, बारावी, विज्ञान आणि वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, बी. फार्मसी, पॉलिटेक्निक, बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षांत प्रवेश घेत असलेल्या होतकरू आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे, त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन फाउंडेशनचे संचालक सुनील रायठठ्ठा यांनी केले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना श्री. रायठठ्ठा यांनी सांगितले की, फाउंडेशनच्यावतीने गेल्या चार वर्षात 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीसाठी आर्थिक व शैक्षणिक निकष आहेत. त्यानुसार विद्यार्थ्याच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजाराच्या आत असावे, त्याचे दहावी किंवा बारावी शिक्षण जालना जिल्ह्यातच झालेले असावे, उच्च पदवी,पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचाच शिष्यवृत्ती देण्यासाठी विचार केला जाणार असून, निवड झाल्यानंतर संबधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पहिल्या वर्षात एकूण 80 विद्यार्थांना या शिष्यवृत्तीचा लाभ होईल. संपूर्ण महाराष्ट्रात दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या लोकसहभागातून एकाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेली सर्वात मोठी शिष्यवृत्ती योजना असून अभ्यासक्रमनिहाय या शिष्यवृत्तीचा सविस्तर तपशील यात अभ्यासक्रम आणि किमान पात्रता पुढीलप्रमाणे आहे.


एमबीबीएस – नीट रँकिंगद्वारे शासकीय महाविद्यालयात प्रवेश आणि बारावीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण असलेले विद्यार्थी पात्र असतील.इंजीनियरिंग – बारावीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण आणि एमएच- सीइटी रँकिंग 7 हजारापर्यंत अथवा जेईई-मेन रँकिंग 20 हजारापर्यंत असलेले विद्यार्थी पात्र असतील.चार्टर्ड अकाउंटंट/फाउंडेशन- बारावी परीक्षेत किमान 85 टक्के गुण असलेले विद्यार्थी पात्र असतील.बी. फार्मसी- बारावीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण आणि एमएच सीईटी फार्मसी रँकिंग 1 हजारापर्यंत असलेले विद्यार्थी पात्र असतील.अकरावी व बारावी : विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीत किमान 90 टक्के तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान 85 टक्के गुण असलेले विद्यार्थी पात्र असतील.पॉलिटेक्निक – दहावीच्या परीक्षेत किमान 75 टक्के गुण आणि शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश असलेले विद्यार्थी पात्र असतील.बीएस्सी नर्सिंग – बारावीत किमान 60 टक्के गुण आणि नीट रँकिंगद्वारे प्रवेश झालेले विद्यार्थी पात्र असतील.


या योजनेसाठीची सविस्तर माहिती आणि अर्ज जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या मंठा रोडवरील महेश भवन समोरील कार्यालयात उपलब्ध आहे तसेच संकेतस्थळ http://www.jefjalna.com/downloads.php आणि ईमेल jefjalna20@gmail.com वर उपलब्ध असून तेथूनही अर्ज डाउनलोड करून ते सविस्तर भरून कार्यालयात सादर करावेत.जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश लाहोटी ,सुनिलभाई रायठठ्ठा, सुनील गोयल, डॉ. हितेश रायठठ्ठा, दिलीप कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी- केसापूरकर , गोविंद काबरा यांनी केले आहे.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button