Jalna District

परतुर आष्टी रस्त्यावर भीषण अपघात एक जण ठार तर पाच जण जखमी

जालना- आष्टी ते परतूर रस्त्यावर आज दिनांक 28 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास  ऑटोरिक्षा व स्विफ्ट गाडी मध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर 3 बालकांसह  एकूण 5
जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

 मंठा येथून परतूर तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील आशिया कुरेशी 30,अदनान कुरेशी 8,अनस कुरेशी 6,जिकरा कुरेशी 4,समद कुरेशी 55,व रिक्षा चालक सतीश खंदारे 30 रिक्षा क्र एम.एच 21.ए. बी 1038 मध्ये आले असता नातेवाईकांना भेटून दुपारी 3 वाजेच्या सुमारास ते आपल्या मंठा या गावी निघाले होते,आष्टी पासून काही अंतरावर परतूर रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ परतूर हुन आष्टी कडे येणाऱ्या भरधाव स्विफ्ट गाडी क्र एम.एच.12 एन.बी 0219 या गाडीने परतूर कडे जाणाऱ्या रिक्षा ला जोरदार धडक दिली धडक येवढी जोराची होती त्यात रिक्षा लांब अंतरावर पलट्या मारून विद्युत खांबास उभे होऊन अडकली यातील समद कुरेशी वय वर्षे 55 हे मृत झाल्याचे परतूर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले .

स्विफ्ट गाडीचा चालक योगेश सोनाजी शिंदे वय वर्षे 27 यांच्या सह उर्वरित सर्व जण गंभीर जखमी झाले असल्याने सुरुवातीला त्यांना नागरिक व पोलिसांच्या मदतीने आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून गंभीर जखमी असल्या कारणाने तातडीने पुढील उपचारासाठी परतूर येथे हलविण्यात आले सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी दिली आहे.

-edtv news9422219172

Related Articles