प्रिय पती राज ,उदय सावंगीकर यांना काव्य सुमन समर्पित.

प्रिय पती राज ,उदय सावंगीकर यांना काव्य सुमन समर्पित.
**************
कधी वाटतात मला ते संत, कधी कधी वाटतात विठ्ठलपंत.
कधीकधी असतात खूप शांत. नको त्यांना लौकिक सुख, नाही कशाचीच खंत.
कधी असतात खवळलेल्या समुद्राची लाट, कधी मात्र फिरवतात माझ्याकडे पाठ. कधी वसंत ऋतू तील आल्हाद वारा, कळतच नाही स्वभावच न्यारा. कधी भासतात स्वाती नक्षत्राचा पाऊस, कोण जाणे केव्हा पुरवतील माझ्या जीवाची हौस .
स्वाती नक्षत्र पावसाचे शिपली होतात मोती, आणि म्हणतात सांगू का तुझ्या वर प्रेम किती? तू तर आई बाबाची लाडकी बाळी, उंच मोल साडी घेईन या वर्षाच्या दिवाळी. आश्वासन देत देत थकतो त्यांचा जीव . अश्या वेळी मला येते त्यांची खूप कीव. कधी होतात माझ्यासाठी गुलमोहर फुललेला , कधी आनंदाने चेहरा असतो खुललेला. संसारात रमत नाही यांचे मन . जीव जडला यांचा कंपनी कृषीधन. कधी वाटतं गृहस्थी की संन्याशी , तुम्हीच सांगा मी यांना ओळखू कशी?????
Sujata Uday Sawangikar
9421318902,9356463912.