मराठवाडा

अन्नाची किंमत ओळखणारा” सालगडी”


जालना
लहानपणी घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दुसऱ्याच्या घरी 7 हजार रुपये सालाने सालगडी म्हणून काम करणाऱ्या तरुणाला अन्नाची काय किंमत असते ती आज कोरोना च्या महामारी मध्ये कळाली आहे. म्हणूनच समाजाचे एक ऋण फेडण्याचा प्रयत्न अन्नदानाच्या माध्यमातून केल्या जात आहे. व्यवसायाने रोडलाईन्स म्हणजेच ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या काकडे रोडलाइन्स चे मालक दत्तात्रय काकडे यांचा सुरू असलेला हा उपक्रम सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

जालना शहरापासून पासून काही अंतरावर असलेल्या खादगाव शिवारात काकडे यांची शेती आहे. या शेतीत गेल्या तेरा दिवसांपासून अन्नछत्र सुरू आहे .शहरात विविध हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्ण आहेत, विशेष करून या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. सहाजिकच या रुग्णांसोबत नातेवाईक देखील तिथे आलेले आहेत, आणि अशा महामारी च्या काळात या नातेवाईकांना पोटभर अन्न देखील मिळत नाहीये. ही बाब लक्षात घेऊन कधीकाळी अन्नासाठी धडपड करणारा आणि दुसऱ्याकडे सालगडी म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय काकडे यांना या गरजूंना अन्नपुरवठा करण्याची इच्छा झाली, आणि पाहता पाहता त्यांनी व्यवसायात असलेले त्यांचे सहकारी या अन्नछत्राकडे वळविलेआणि त्यांच्या शेतामध्ये सुरू झालं ते अन्नछत्र.
परिवारातील पंधरा-वीस आबालवृद्ध मित्रमंडळी आणि या सेवा कार्यात स्वतःला झोकून देणारे काही आप्तेष्ट असे पाहता पाहता 50 जणांची टीम झाली आणि सर्वांनी हे सेवा कार्य हाती घेतले. कोणाच्याही मदतीशिवाय कोणाकडूनही आर्थिक किंवा अन्य पद्धतीने मदत न घेता स्वखर्चाने सध्या हा उपक्रम चालू आहे. ज्या गरजूंना डबा आवश्यक आहे त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर दिलेल्या बोर्डवरील क्रमांकावर संपर्क साधायचा आणि डब्याची बुकींग करायची अशी पद्धत आहे. त्यामुळे डब्बा पोहोचवणे सुरळीत झाले आहे आणि ज्याची बुकिंग त्यालाच डबा हे सूत्र असल्यामुळे किती डबे तयार करायचे याचा देखील अंदाज येत आहे.
रोज सकाळी सहा ते नऊ आणि संध्याकाळी तीन ते सात या वेळेत हे डबे बनवण्याची तयारी काकडे यांच्या शेतात सुरू असते. रोजचे सकाळी साडेतीनशे आणि संध्याकाळी साडे तीनशे सुमारे सातशे डब्बे रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोच केले जातात.
तीन पोळ्या, दोन भाज्या, भात, कांदा, कैरी, आणि मिठाची पुडी, असे घरी जे मिळते तेच या डब्यांमध्ये मिळते .त्यामुळे गरजूंना पोटभर अन्न खायला मिळत आहे. मात्र या सर्व अन्नछत्रा चा कुठेही गवगवा न करता एक सेवाभाव म्हणून हाती घेतलेले हे कार्य करतांना काकडे परिवाराच्या आनंदाला उधाण येत आहे.

* जालना जिल्ह्यातील सर्व तालुके आणि जिल्हा परिषद सर्कल च्या ठिकाणी प्रतिनिधी नियुक्त करणे आहे इच्छुकांनी आपला अर्ज 82759 50190 या क्रमांकावर व्हाट्सअप करावा*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button