जीव घेतेस तू गं सखे साजणे- कृष्णा आर्दड

जीव घेतेस तू गं सखे साजणे
*काय डोळ्यातुनी हे तुझे लाजणे,*
*जीव घेतेस तू गं सखे साजणे…*
*हात हातामध्ये, ओठ ओठात दे*
*वादळाला उभ्या, तू गं श्वासात घे*
*पार वेडावते हे तुझे लाजणे*
*जीव घेतेस तू गं सखे साजणे*
*नथ नकातली, बट केसातली…*
*काय गोडी तुझ्या, गोड ओठातली..*
*चंद्र हो तू अता कर मला चांदणे,*
*जीव घेतेस तू गं सखे साजणे..*
*तू चालतांना हवा, मंद-मंदावते*
*भर ऊन्हाळ्यातही, ऊन थंडावते*
*काय जादू जनू हे तुझे चालणे,*
*जीव घेतेस तू गं सखे साजणे*
*काय डोळे तुझे, ओठ मखमल किती,*
*अप्सरेला जणू हारण्याची भिती..*
*रूप तुझे पाहुणी रातभर जागणे*
*जीव घेतेस तू गं सखे साजणे…*
*तुच ह्रदयात तू, तुच ध्यासात तू*
*तुच तू तुच तू, तुच श्वासात तू…*
*गाढ झोपेतही हे तुझे भासणे,*
*जीव घेतेस तू गं सखे साजणे..*
*कृष्णा आर्दड*
*राजाटाकळी या घनसावंगी जि जालना*
*मो 7410120335*