श्री आनंद कृपा उद्योगाच्या दिवाळी प्रदर्शनाला सुरुवात
जालना- श्री आनंदी कृपा उद्योगाच्या दिवाळी प्रदर्शनाला आज सायंकाळी प्रारंभ झाला .शनी मंदिर चौकामध्ये एका इमारतीत विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पुढील तीन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, व्यापारी सतीश पंच, यांच्यासह शुभांगी देशपांडे, यांचीही यावेळी उपस्थिती होती. या प्रदर्शनामध्ये दिवाळीशी निगडीत असलेल्या व्यवसायावर जास्त भर देण्यात आला आहे .त्यामध्ये दिवाळीसाठी घराला लागणारे तोरण, लक्ष्मीपूजनासाठी लागणारा प्रसाद ,आणि अन्य साहित्य. तयार कपडे, पिशवी, भेटवस्तू देण्यासाठी फोटो फ्रेम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरगुती तयार करण्यात आलेले फराळ. यामध्ये विविध प्रकारचे शंकरपाळे, चिवडा, यासोबत सातूचे पीठ, मेतकूट ,अशा खमंग पदार्थांचाही समावेश आहे.
एका छोटेखानी झालेल्या उद्घाटनासाठी दिपक रणनवरे ,आनंदी आयर यांनी परिश्रम घेतले. यावेळी दीपा बिनीवाले, अरूणा फुलमामडीकर यांच्यासह विविध स्टॉल धारकांची उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*
edtv news,9422219172