Advertisment
दिवाळी अंकराज्य

नाथ्रेकर स्मृती प्रतिष्ठान,संस्कृत प्रचार आणि प्रसार

स्वातंत्र्यसैनिक व संस्कृत पंडित कै. सखारामपंत नाथ्रेकर गुरुजींनी श्री स भु प्रशाला जालना येथे 1962 ते 1978 अशी सोळा वर्षे संस्कृत व इंग्रजीचे अध्यापन केले. तसेच पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदेही समर्थपणे पेलली. 1989 च्या जुलै महिन्यात गुरुजी ब्रम्हानंदात विलीन झाले. त्यांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुली यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसार कार्यासाठी नाथ्रेकर स्मृती प्रतिष्ठानची स्थापना केली. 1989 साली स्थापन झालेले हे प्रतिष्ठान, बालवाडी ते खुला गट अशा एकूण पंधरा गटांमध्ये संस्कृत भाषेच्या अभिवृद्धीसाठी गीता जयंती निमित्य भगवद्गीता पाठांतर स्पर्धा, संस्कृत कथा कथन, सुभाषित पाठांतर, संस्कृत प्रश्नमंजुषा, संस्कृत चरित्र कथन, संस्कृत नाटक, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, मंत्र पुष्पांजली, संस्कृत गीत गायन, स्तोत्र पाठांतर, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विष्णुसहस्रनाम पाठांतर स्पर्धा, संस्कृत मधून साभिनय बडबड गीत अशा स्पर्धा जालना जिल्हा पातळीवर आयोजित करत आले आहे.

गेल्या सहा वर्षापासून ह्या स्पर्धा औरंगाबाद जिल्हा पातळीवर आयोजित केल्या जातात. दोन्ही जिल्ह्यात पंधरा गटातून तीन विजयी स्पर्धकांना, जालना जिल्ह्यातून 45 विजयी स्पर्धकांना स्मृती चिन्ह आणि गौरव पत्र तसेच औरंगाबाद विभागातून 45 विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व गौरव पत्रा ने सन्मानित केले जाते. अशी एकूण 90 स्मृतिचिन्हे दरवर्षी वितरित केले जातात. तसेच बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून त्यामुळे संस्कृत मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास स्मृतिचिन्ह गौरवपत्र देऊन गौरवण्यात येते. तसेच संस्कृत विषयात एम फिल, पि.एचडी, नेट, सेट उत्तीर्ण होणाऱ्या व्यक्तींचा प्रतिष्ठान सत्कार करत आले आहे. संस्कृतवर प्रभुत्व असणाऱ्या महनीय व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून त्यांचे मार्गदर्शन सुद्धा प्रतिष्ठान ठेवत आले आहे. गुरुजींची कर्मभूमी असलेल्या श्री स भु प्रशाला जालना येथे या स्पर्धा व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होतो, तर गुरुजी स्वातंत्र्यसैनिक असल्याने एस आर टी कार्यालयाच्या स्वातंत्र्यसैनिक सभाग्रहात औरंगाबाद येथे स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतो. दोन्ही जिल्ह्यातून सर्व स्पर्धांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे प्रतिष्ठानचे संस्कृत प्रचार आणि प्रसाराचे कार्य अतिशय यशस्वी रित्या वाटचाल करताना दिसते. विशेष म्हणजे ह्या कामासाठी प्रतिष्ठान कोणाकडूनही कुठलीही आर्थिक मदत घेत नाही. तसेच स्पर्धकांना देखील कुठल्याही प्रकारची प्रवेश फी आकारत नाही.

त्यात कोरोना काळात प्रतिष्ठानने ऑनलाईन स्पर्धा घेतल्या आणि ह्या स्पर्धा केवळ जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यापुरत्या मर्यादित न राहता, भारतातच नव्हे तर विदेशात पोहचल्या. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसाराचे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन पोहचले हे विशेष तसेच लोकांच्या आग्रही मागणीला विचारात घेऊन ऑनलाइन संस्कृत संभाषण वर्गाचेही आयोजन प्रतिष्ठानने भरपूर प्रतिसादासह यशस्वीरीत्या पूर्ण केले.

*साभार-नाथ्रेकर स्मृती प्रतिष्ठान , संस्कृत प्रचार आणि प्रसार.*+91 82088 68095

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button