दिवाळी अंकराज्य

चंद्र-प्रा.सुरेखा मत्सावार

चंद्र(एक)
एक पहाटेच्या वेळी चंद्र समोरच्या खिडकीतून डोकावतो
सळसळणाऱ्या पिंपळाच्या आडुन खुणावत राहतो.

फिक्कट प्रकाश पाझरत असतो ,

जेव्हा चंद्र ही फिकूटलेला असतो.

बर्‍याचशा चांदण्या मिटलेल्या असतात मंदपणे.

थोड्या उरलेल्या मिणमिणत राहतात हळुवारपणे.

आकाशातील चंद्र तारे जणू निरोप घेत असतात .

असा चंद्र ही मनाला भावतो वेगळाच असला तरी आपला वाटतो.

चंद्र (दोन)

चंद्र जेव्हा खुणावत असतो कुणाची तरी आठवण करून देतो.

पहाटेच्या नीरव शांततेत पिंपळ पानांची सळसळ रोमांचक असते

अशाच एका पहाटे कधीतरी अनोखे घडलेले असते,

आठवणीसुद्धा रोमांचआणतात, मनामध्ये झिरपत राहतात,

चंद्र असतो सोबती कुणाकुणाचा, आठवणीने भरलेल्या मनाचा.
चंद्र ढगाआड ऊन डोकावत असतो कुणाची तरी आठवण करून देतो.

प्रा.सुरेखा मत्सावार
+91 88560 26079

Related Articles