एकाने लावले पिस्टल तर दुसऱ्याने लावला चाकू; वसुंधरा नगरात भरदिवसा थरार
जालना
भोकरदन नाका ते मोंढा रस्त्या दरम्यान असलेल्या वसुंधरा नगर मध्ये आज भर दिवसा एका व्यापाऱ्याने पिस्टल आणि चाकूचा थरार अनुभवला. नळाचे साहित्य विक्री करणारे सावरमल जाला यांचे पारस एजन्सी नावाने दुकान आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे हे दुकान ही बंद आहे. परंतु दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिघे जण नळाचे साहित्य मागण्यासाठी आले होते. दुकान बंद असल्यामुळे जाला यांनी त्यांना परत पाठविले. हे तिघे जण पुन्हा साडेबारा वाजता जाला यांच्याकडे आले, आणि आमचे काम बंद पडले आहे साहित्य द्या अशी मागणी करू लागले. त्यानंतर जाला हे कसेबसे साहित्य देण्यास तयार झालेआणि दुकानात वळाले. तेवढ्यात गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या तिघांनी गेट वरून आत मध्ये उड्या मारल्या आणि जाला यांना पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवला
जाला याना एकाने पिस्टल तर दुसऱ्याने चाकू लावला आणि सीसीटीव्ही कॅमेरा चे डीव्हीआर कुठे आहे ते विचारले. ितिसऱ्यामजल्यावर असलेला डीव्हीआर आणण्यासाठी एक जण गेला दरम्यानच्या काळात जाला यांनी चाकू लावलेल्या आरोपी सोबत झटापट केली. यावेळी आरडाओरड झाल्याने वर गेलेला आरोपी देखील खाली पळत आला. आणि याच वेळी ज्या आरोपीने पिस्टन लावले होते त्याने जाला यांच्या डोक्यात पिस्टलने वार केला आणि त्यांना जखमी केले .
दरम्यान आरोपींनी पंचवीस हजार रुपये रोख आणि इतर काही सोन्याचे दागिने लंपास केले आहे .सायंकाळी उशिरापर्यंत सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणेने भेट देऊन पाहणी केली आहे.