कोरोना अजून गेलेला नाही- आरोग्य मंत्री टोपे

जालना- गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरनाची महामारी अजून संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन दिवाळी सण साजरा करावा असे आवाहन जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. आज भाग्यनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी जनतेला आवाहन ही केले आहे. ते म्हणाले” कोरोना आजार अजून गेला नाही, याचे भान ठेवावे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी घालून दिलेल्या नियमावलीचे पालन ही करावे. त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवावी, झोप वेळेवर घ्यावी, आहारावर देखील नियंत्रण ठेवावे असेही त्यांनी सांगितले. दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करत असताना पर्यावरण विभागाने घालून दिलेल्या नियमांचेही पालन करावे असेही ते म्हणाले. वातावरण बदलामुळे चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, या आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभाग नियमितपणे या साथीच्या आजारांवर काम करीत असतो आणि सध्या येथे करीत आहे. परंतु नागरिकांनी देखील कोरोना अजून गेलेला नाही याचे भान ठेवावे, याचा पुनरुच्चारही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला.
-दिलीप पोहनेरकर,9422219172
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk