राज्य

माजी खासदार पुंडलिकराव दानवे चारित्र्य सम्पन्न व्यक्तिमत्व

जालना-जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे दिनांक आज दि.1 रोजी सकाळी 10.00 वाजता वयाच्या 95 च्या वर्षी  निधन झाले. गेल्या दीड महिण्यापासून  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातील अथक व शर्वीच्या प्रयत्नावर नियतीने मात केली. आणि एक निष्कलंक खासदार महाराष्ट्रातील व देशातील एक चारित्र्य संपन्न तत्यनिष्ठ राजकारणी व प्रामाणिक देशभक्ताने आपला अखेरचा निरोप घेतला.

भोकरदन तालुक्यातील  पिंपळगाव सुतार या छोटयाशा गावात जन्मलेला हीरा आपल्या युद्धीमत्तेच्या व जनसंपर्काांच्या जोरावर भारताच्या संसदेत चमकला. त्याकाळी भाजपसारख्या पक्षाचे प्रायल्य नसताना गाव न गाव फिरून भाजप उभी केली व त्या काळात ज्या वेळी भाजपचे संसदेत केवळ दोनच खासदार देशातून निवडून गेले. त्यामध्ये भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी व महाराष्ट्रातून केवळ एकमेव पुंडलिक हरी दानवे भारताच्या संसदेत पोहोचले. 

1952 पासून राजकारणात सक्रिय असलेले पुंडलिक हरी दानवे यांची घरची गरिबीची असतांना सुद्धा स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून जनसेवेचा वारसा नेटाने पुढे नेला. आणीबाणीच्या काळात स्वतःची पत्नी आजारी असतांना सुद्धा जनतेसाठी तुरुंगात जाणारा सच्चा देशभक्त आज काळाच्या पडद्याआड गेला.

पुंडलिक हरि दानवे यांचा राजकिय प्रवास –

काही काळ गाव व परिसरात शिक्षक म्हणून कार्य करून अनेकांना पोटा पाण्याला लावण्याच्या पचीत्र कार्यामुळे त्यांना परिसरात सुरवातीला मास्तर म्हणुन ओळखायचे. त्यांची खरी राजकिय कारकिर्द सुरु झाली ती पिंपळगांव ग्रामपंचायतचे बिनविरोध 15 वर्ष सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे 15 वर्ष चेअरमन या पदावरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली राजकिय कारकिर्द फुलविली. 5 वर्षे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद या स्तरावरून राजकारण करत 1967 साली पहिली विधानसभेची निवडणुक काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसुन दिग्गज विरोधक मोटार गाडीने व पुंडलिक हरी दानवे बैलगाडीने प्रचार करत निवडणूक लढविली त्यावेळी त्यांचा अवघ्या 1500 मतांनी पराभव झाला.

 

त्यावेळी पराभवाने खचून न जाता आपले जनकार्य करत राहिले. 1977 साली जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवीली. तात्कालीन पंतप्रधान इंदीराजी गांधी यांचे निकटवतीय तथा माजी महसूल मंत्री माणिकराव दादा पालोदकर यांचा पराभव करत जालना जिल्ह्याचा खासदार होण्याचा मान मिळवला. पुन्हा 1989 साली भाजपाकडुन त्यांनी निवडणुक लढवून बाळासाहेब पवार यांना पराभूत करून ते जालना लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा खासदार झाले. लोकसभेमध्ये खासदार पदाची संस्कृतमधून शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील पहिले खासदार होते. संस्कृतमधून शपथ घेतल्यामुळे भारताचे तात्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी त्यांचा सत्कार केला होता.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या भागात भाजपसारखा पक्ष जोमाने उभा करत 1990 साली मतदारसंघ पिंजून काढत विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मा.ना. रावसाहेब पाटील दानवे यांना भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार करून खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. दोनवेळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहून जिल्ह्यात भाजपाचा पाया मजबुत केला.

संघर्ष काय आणि कसा असावा याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पुंडलिक हरि दानवे, आणीबाणीच्या काळातील तुरंग वास असो, राजकारणातील चढ उतार असो त्यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्या कार्याच्या जोरावर मोठा मुलगा श्री. बबनराव पुंडलिकराव दानवे 10 वर्ष सरपंच व दुसरे चिरंजीव श्री. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे है 10 वर्ष सरपंच, एक वेळ जि. प. सदस्य, तीन वेळेस आमदार म्हणून निवडुन आले व आमदारकिच्या माध्यमातून वडीलांचा जनसेवेचा वारसा पुढे चालू ठेवला.

आज मृत्युशी अखेरची झुंज देतांना महिण्याचे प्रयत्न हारले व नियती जिंकली. व एक सच्चा देशभक्त, तत्वनिष्ठ, राजकारणी, उत्कृष्ठ ससंदपद, साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले राजकारणातील संत पुंडलिक हरी दानये आज आपला निरोप घेऊन गेलेत.

मी तर जन्मजात पीएचडी (PHD) म्हणजे पुंडलिक हरी दानये असे अतिशय खळखळुन सांगणारे कवी मनाचे संवेदनशील नेते म्हणून त्यांची जनमाणसात मोठी प्रतिमा होती. जालना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असो या महाराष्ट्रातील इतर काना कोपरा असो. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक अनुयायी जोडल्या गेले. भारताचे मा. पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई यांच्या सहवासात राहुन सुद्धा आपला साधेपणा कधी ढळू दिला नाही. केवळ आणि केवळ लोकांसाठी काम करायचे या उदात्त हेतुने आपले कार्य निस्वार्थीपणे करत राहणे हेच त्यांच्या जीवनाचे सुत्र होते. त्यांच्या जाण्याने जालना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अनुयायी, कार्यकर्ते, जीवलग मित्र व भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

आज जे आपण राजकिय वर्तुळातील नेते बघतोय, अनुभवतोय त्याला एक अपवाद असलेले पुंडलिक हरि दानवे यांच्या जाण्याने एका मोठ्या युगाचा अंत झाला. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या पश्चात पुत्र भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, मा.सरपंच श्री. बबनराव पुंडलिकराव दानवे, लढवय्ये युवा नेतृत्व श्री. सुधाकर पुंडलिकराव दानवे व मुलगी सौ. जिजाबाई शंकरराव जाधव व जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button