Advertisment
Jalna District

पहा कोणत्या तालुक्याला मिळाला किती निधी

जालना-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणुन जालना जिल्ह्यासाठी  425 कोटी 7 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन त्यापैकी 357 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी विविध बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे.  हा निधी येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बँकांना दिले आहेत. 

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिक, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची मदत म्हणुन  शासनाकडुन निधी प्राप्त झाला असुन प्राप्त झालेल्या निधीपैकी 84 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकांना वितरित करण्यात आला असुन उर्वरित निधीही तातडीने बँकांकडे वर्ग करत दिवाळपुर्वी हा निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालाच पाहिजे, याबाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपवुन घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा होईल, यादृष्टीने आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या. 

बँकांकडे वर्ग करण्यात आलेला निधी

जालना तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी 68 कोटी 3 लक्ष रुपयांचा निधी बँकेकडे वर्ग करण्यात आला आहे तर बदनापुर 34 कोटी 52 लक्ष, भोकरदन-44 कोटी 58 लक्ष, जाफ्राबाद- 23 कोटी 74 लक्ष, परतुर-35 कोटी 48 लक्ष, मंठा-38 कोटी 38 लक्ष, अंबड-59 कोटी 63 लक्ष तर घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. 

-edtv news,9422219172  डाउनलोड करा

https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button