मराठवाडा

मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त


जालना
नवीन जालना भागातील गरीब शहा बाजार परिसरात असलेल्या एका गोदामावर औषधी प्रशासन आणि महसूल प्रशासनाने रविवारी रात्री साडेअकरा वाजता छापा मारला. या छाप्या मध्ये मोठे 40 आणि लहान 9 असे एकूण 49 सिलेंडर महसूल प्रशासनाने जप्त केले आहे.

सतीशचंद सुभाषचंद जैन राहणार नेहरू रोड यांच्या मालकीचे हे गोदाम आहे. या गोदामामध्ये ऑक्सिजनच्या सिलेंडरचा साठा केल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल प्रशासन आणि औषधी प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली दरम्यान जप्त केलेले सिलेंडर हे काही ऑक्सिजनचे तर काही नायट्रोजनचे असल्याचे सांगण्यात येत आहे .सोमवारी या सर्व सिलेंडरची तपासणी केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.
या कारवाईच्या वेळी अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षीका अंजली मिटकरी मंडलाधिकारी भोरे ,सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, यांची उपस्थिती होती .
*अशी होऊ शकते कारवाई*
जर या सिलेंडर मध्ये ऑक्सीजन मे भरलेले सिलेंडर आढळून आले तर अन्न औषधी प्रशासन कारवाई करू शकते .याच वेळी आपत्ती व्यवस्थापनाचा देखील कायदा लागू झाल्यामुळे महसूल प्रशासन स्वतंत्र कारवाई करू शकते.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button