जालना जिल्हा

जब तक रोड नही तब तक वोट नही; चरवाईपुराच्या नागरिकांचे निर्धार

जालना-नगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम आता हळूहळू वाजायला सुरुवात झाली आहे, आणि ही सुरुवात नागरिकांनीच केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा सुज्ञ नागरिकांच्या दारात मत मागण्यासाठी जाताना भावी उमेदवाराला चांगलाच विचार करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

याची सुरुवात केली आहे ती प्रभाग क्रमांक6 मराठा बिल्डींग सर्वाई पुरापासून या भागातील नागरिकांनी. या भागात जाणाऱ्या प्रवेशद्वारावरच मोठा फलक लावला आहे आणि कोरोना लसीकरणात अमिताभ बच्चन यांनी वापरलेल्या भाषेनुसार स्पष्ट शब्दात लिहिले आहे “जब तक रोड नही, तब तक होट नही” आणि हकीकत म्हणजे खरोखरच या नागरिकांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. उघड्या नाल्या, आणि त्या बाजूला साचलेले कचऱ्याचे ढीग, त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिक कचरा आणून टाकत असल्यामुळे या वस्तीतील नागरिकांनी नामी युक्ती लढवली आहे आणि नाली च्या बाजूला आडव्या उभ्या असलेल्या दगडांना शेंदूर फासला आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना या कचऱ्याच्या ढिगाचा बंदोबस्त झाला आहे .आणि बाजूला असलेला हा कचरा आता नाल्यांमध्ये जात असल्यामुळे नाल्या ही तुंबलेल्या आहेत. वातावरण बदलामुळे आणि नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे या परिसरात डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रभागात रस्तेच केली नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

दरम्यान या संदर्भात 18 जून रोजी नगरपालिकेला निवेदनही दिले आहे. या कॉलनीतील साचलेल्या कचऱ्यांचे ढीग याप्रमाणे पालिकेने हे निवेदन देखील कचराकुंडीत टाकले आहे. त्यामुळे आता नागरिक चांगलेच संतापले आहेत, आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये रस्ते झाल्याशिवाय मतदान करणार नसल्याचा निर्धार केला आहे. एवढेच नव्हे तर दिवाळी झाल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार नगरपालिके समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनावर गोपाळ यादव, विनोद ठाकुर ,प्रभातीलाल शर्मा, रामदेव वर्मा, एस.बी. बनिया, अनिल यादव, शिवरतन शर्मा, लाहोटी, आदींच्या सह्या आहेत.

-दिलीप पोहनेरकर,edtv news, 9422219172अपडेट बातम्या पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EDTvJalna.apk

Related Articles