Taluka

निराधारांच्या पैशावर डल्ला बँक कर्मचाऱ्याने पकडले दलालाला


जालना
निराधारांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये याप्रमाणे तीन महिन्याला साडेचार हजार रुपये शासन ही रक्कम जमा करते. परंतु अशा निराधारामध्ये अनेक जण असे आहेत की ज्यांना याविषयी माहीतच नाही, किंवा अनेक जण मयत झाले आहेत. असे असताना देखील या निराधारांच्या खात्यावरील रक्कम हडप करण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे . जुन्या जालन्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून एका निराधार महिलेची रक्कम हडप करताना एका दलालाला पकडून देण्याचे धैर्य बँकेच्या शिपायाने दाखवले आहे, आणि या दलाला वर गुन्हा दाखल करण्याची हिंमत बँक व्यवस्थापकाने केली आहे .त्यामुळे दलालांची टोळी आता मोडीत निघण्याची शक्यता आहे.

शुक्रवार दिनांक सात रोजी नियमितपणे या बँकेचे कामकाज सुरू होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक वृद्ध महिला पैसे काढण्यासाठी खजिनदाराच्या खिडकीजवळ गेली .यावेळी काम करत असलेल्या महिला कर्मचारी आदीलक्ष्मी यांनी महिले कडील पासबुक घेतले आणि या महिलेला नाव विचारले. पासबुकवर शशिकला भिमराव भिगी हे नाव होते मात्र या महिलेने तिचे नाव चंद्रभागा ठोकळ असे सांगितले .दोन्ही नावमधील तफावत बँक अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यामुळे आपले बिंग फुटले ,हे लक्षात येताच या वृद्ध महिलेच्या बाजूला उभा असलेला दलाल पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात बँकेचे शिपाई पुरुषोत्तम भाले यांनी या दलालाला पकडले .यावेळी या दोघांमध्ये झटापटही झाली परंतु उपस्थित ग्राहकांच्या मदतीने या दलाला पकडण्यात कर्मचाऱ्याला यश आले .
लक्कडकोट भागात राहणारा अमजद बाबु पठाण वय 35 असे या दलालाचे नाव आहे. दरम्यान याच्याकडे अधिक माहिती विचारली असता तो काही बोलण्यास तयार नव्हता. त्यामुळे बँक व्यवस्थापक कमोद देडे यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वृद्ध महिला आणि या दलाला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

* अशी काढायचे रक्कम*
अमजाद बाबू पठाण हा निराधार महिलांचे किंवा मयत झालेल्या महिलांचे पासबुक मिळवायचा आणि या पासबुक आधारे बनावट महिला बँकेच्या रांगेमध्ये उभे करायचा. ज्या महिलेला रांगेत उभा करायचा तिला उभे राहिल्याबद्दल शंभर रुपये देखील मोबदला म्हणून देत असे. हीच महिला यापूर्वी तीन वेळा याच्या सोबत घेऊन प्रत्येक वेळी शंभर रुपये घेऊन गेले आहे. तशी तिने कबुलीही दिली आहे, मात्र प्रकार काय आहे हे तिला माहीत नाही. वृद्ध महिलेचा खिडकीजवळ नंबर आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारल्यास हा दलाल सावरासावर करायचा .
दरम्यान अशा प्रकारची टोळी याच नव्हे तर सर्वच बँकांमध्ये निराधारांचे किंवा मयत झालेल्या वृद्धांचे पैसे हडप करण्यासाठी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे .परंतु या बँकेत पकडलेल्या या दलालांमुळे आता निश्चितच अशा प्रकारांना आळा बसेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. अशा प्रकारच्या निराधारांच्या खात्यामध्ये शून्य रकमेवर देखील खाते सुरू राहते. त्यामुळे दर तीन महिन्यांनी हे दलाल अशा निराधारांच्या खात्यावर टपलेले असतात .दरम्यान कदीम जालना पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक निशा बनसोड यांनी या दलालाला अटक केली आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button