जालना जिल्हा

आडवली स्कार्पिओ: सापडले ट्रॅक्टर चोरटे

जालना- गोंदी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या शहागड चौकीचे पोलीस दिनांक 19 सप्टेंबर रोजी साष्ट पिंपळगाव परिसरात गस्त घालत होते .यादरम्यान एका स्कार्पिओला त्यांनीअडवले, परंतु स्कार्पिओ चालक पळून जाण्याच्या तयारीत होता. असे असतानाही हिरडपुरी भागात या स्कार्पियो चा पाठलाग केला मात्र चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. हाच धागा पकडून शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कोलासे यांनी दोन ट्रॅक्टर चोर पकडले आहेत.त्यांच्याकडून 15 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक गजानन कोलासे आणि त्यांची टीम गस्त घालत असताना साष्ट पिंपळगाव जवळ एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ ला आडवले, परंतु या स्कार्पिओ चालकाने पोलिसांना चकवा देत गाडी सुसाट वेगाने पळवली. या गाडीचा पाठलाग करत हिरडपुरी परिसरात स्कार्पियो चालक गाडी सोडून पळून गेला. त्यानंतर ही गाडी पोलीस ठाण्यात आणून लावली. दरम्यानच्या काळात गणेश नरसाळे यांनी त्यांच्या ऊस वाहतुकीचे हळके चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली होती, तसेच योगेश उंबरे यांनीदेखील स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार दिली होती.

या स्कार्पिओ चालकाचा आणि मालकाचा तपास करीत असताना पोलिसांच्या लक्षात आले की रात्री बेरात्री ही स्कार्पिओ र चोरी करण्यासाठी ठिकाणे ठरवत होती . पुढील तपास करत असताना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली की गणेश नरसाळे यांचे होळके शहागड येथे राहणाऱ्या संजय उत्तमराव खरात याने चोरून नेले आहे आणि ते गेवराईला बंगालीपिंपळा येथे नेऊन ठेवले आहे. पोलिसांनी आरोपी संजय खरात याला सोबत नेऊन बंगालीपिंपळा येथून हे हळके जप्त केले आहे.

दुसऱ्या प्रकरणात चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर संदर्भात पोलिसांनी बीड जिल्ह्यात सर्वत्र माहिती दिली होती. त्या अनुषंगाने अंबळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही ट्रॅक्टर चोर पकडले असल्याची माहिती तेथील पोलिसांनी गोंदी पोलिस ठाण्याला कळवली आणि त्यानंतर गोंदी पोलिसांनी अमळनेर येथे जाऊन तिकडच्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणात आरोपी असलेला, अंबादास विक्रम मिसाळ राहणार, पिंपळनेर जिल्हा बीड .याला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता त्याने हे ट्रॅक्टर त्याच्या एका नातेवाईकाच्या घरासमोर नेऊन सोडले असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस आणि आरोपी दोघेही तिथे गेले मात्र ट्रॅक्टर तिथे नव्हते. आणि पुन्हा ट्रॅक्टरचा शोध घेत असताना शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंग बदललेले एक बेवारस ट्रॅक्टर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या ट्रॅक्टरची खात्री केली असता योगेश उंबरे यांचे ट्रॅक्टर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन कोलासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तपास लावला. दरम्यान संजय उत्तमराव खरात, शहागड. अंबादास विक्रम मिसाळ, पिंपळनेर या दोन्ही आरोपींना गोंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button