जालना जिल्हाराज्य

जालना साखर कारखाना सुरू करण्याचे माजी मंत्री खोतकरांचे सुतोवाच

जालना- गेल्या पंधरा वीस वर्षांपासून बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जालना चे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी केली.

दीपावली स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री खोतकर यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांसाठी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर ,ए. जे .बोराडे, मनीष श्रीवास्तव, युवा सेनेचे नेते अभिमन्यू खोतकर, प्रकाश चव्हाण, बाला परदेशी, भगवानराव कदम आदींची यावेळी उपस्थिती होती.

पुढे बोलताना खोतकर म्हणाले की ,गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, आणि त्या संदर्भात बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. जाधव यांच्यासोबतही बोलणे झाले आहे , त्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. कारखाना सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी, आणि भोकरदन तालुक्यातील राजुर या गटातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी ची नुकसान भरपाई मिळालेली नाही. यासंदर्भात आपण लवकर जिल्हाधिकारी, कृषिमंत्री, तसेच मदत व पुनर्वसन मंत्र्यांना भेटून दोन-तीन दिवसांमध्ये ही मदत शेतकऱ्यांना मिळवून देऊ. असे आश्वासनही त्यांनी दिले.
राजकीय भाष्य करताना त्यांनी भविष्यातील आघाडीच्या सरकारचे गणित मांडताना सांगितले की ,शिवसेना पन्नास काँग्रेस 50 आणि राष्ट्रवादी 50 असे प्रत्येक पक्ष प्रत्येकी पन्नास जागा निवडून आणणार आहे, आणि दीडशे जागा आमच्या आल्यानंतर विरोधी पक्षाचा विषयच कुठे राहतो? दरम्यान त्ताधार्‍यांच्या मागे केंद्र सरकारने इडी लावून परेशान करणे सुरू केले आहे. त्यांचा एकमेव कार्यक्रम म्हणजे त्ताधार्‍यांच्या विरोधात बोलणे. आणि त्यांच्या कामात आडकाठी आणणे. या प्रकरणाचा कंटाळा आल्यानंतर आता आघाडी सरकारमधील नवाब मलिक यांनी तोंड उघडले आहे. त्यामुळे आता विरोधक बिळामध्ये पळत आहेत. “मी पुन्हा येणार” म्हणणाऱ्यांची आता खैर नाही आणि आमचे दीडशे उमेदवार निवडून आल्यानंतर यांनी ती अपेक्षाही करू नये, असा टोलाही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मारला.

-दिलीप पोहनेरकर,9422219172
डाउनलोड https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button