जालना जिल्हा
लोधी मोहल्ला भागात तुफान दगडफेक; दोन पोलीस जखमी; दहा जणांना घेतले ताब्यात
नवीन जालना भागात असलेल्या लोधी मोहल्ल्यामध्ये आज सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली.
या दगडफेकीत मध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत .दगडफेक झाल्याची माहिती कळताच शहरातील सदर बाजार पोलिस ,चंदंनजिरा पोलीस, कदीम जालना पोलिस आणि तालुका पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यापाठोपाठ अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनीदेखील घटनास्थळाकडे धाव घेऊन कारवाईला सुरुवात केली.
दरम्यान या परिसरातील काही घरांमधून 10 संशयितांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .एकंदरीत या परिसरामध्ये तनावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांनी वाहनांची देखील नासधूस केले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com