आता एसटी कार्यशाळेतील कर्मचारीही संपावर

जालना; राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवे प्रमाणे वेतन व भत्ते मिळावेत या प्रमुख मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आता जालना विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी देखील मंगळवार दिनांक 9 पासून बेमुदत संपावर गेले आहेत.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिवहन मंत्री अनिल परब यांना आज हे निवेदन पाठविण्यात आले. तसेच प्रवाशांची होणारी गैरसोय आणि महामंडळाच्या होणाऱ्या नुकसानीला राज्य परिवहन महामंडळाच जबाबदार राहील असेही या निवेदनात म्हटले आहे. जालना आगारातील कार्यशाळेतील 46 कर्मचाऱ्यांनी या संपात भाग घेतला आहे. आज निवेदन देण्यासाठी सुशील शेळके, विजय मगरे ,नागेश डोईजड, राहुल वाहुळे, गजानन ठोंबरे, हे कर्मचारी उपस्थित होते.
– दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172