भिक्षूंचे संविधान म्हणजे ‘पातीमोक्ष’ – भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र

जालना-नालंदा बुद्ध विहार संघभूमि नागेवाडी जालना येथे दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी महाकठीण चीवरदान विधी संपन्न झाला. या वेळी अनेक भिक्खूची उपस्थिती होती. त्यामध्ये भदन्त खेमधमो, भदन्त शरणानंद, भदन्त अंगुलीमाल, भदन्त सत्यपाल, भदन्त शिवली,भन्ते धम्मकीर्ती यांची धम्मदेशना साठी प्रमुख उपस्थिती होती.
या कठीण चीवरदान प्रसंगी मंगल सुरेशराव साळवे,सुरेखा माधव पात्रे, यशोधरा कल्याण बाळराज, बाबासाहेब मगर, कविता बुक्तरे, मीना सर्जेराव शरणांगत, संगीता बाबासाहेब लहाने, भगवान तायडे, माया खिल्लारे, नालंदा बुद्ध विहार येथील अष्टशील महिला मंडळाने व अनेक श्रद्धावान उपासक उपासकांनी भिक्खू संघास चीवरदान दिले.
धम्मदेशक भदंत सत्यपाल महास्थविर म्हणाले
“भिक्खूचे चीवर हे थेट बुद्धाशी बुद्धपुत्र म्हणून नाते जोडते. बौद्ध धम्मामध्ये धम्मदान, ज्ञानदान,भोजनदानासह चीवरदाना स सर्वोच्च स्थान आहे.आपणास चीवर दानाचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर विनयपिटक वाचणे महत्त्वाचे आहे. कठीण स्कंध,चीवरस्कंध व वर्षापनाईका स्कंध, वाचून-समजून आचरणात आणणे अतिशय महत्त्वाचे आहे , असे प्रतिपादन भदन्त सत्यपालजी यांनी केले.
महाकठीण चीवरदानाच्या प्रसंगी भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर लिखित “भिक्खू पातीमोक्ष व कम्मवाचा” हे हिंदी पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले.
-दिलीप पोहनेरकर,edtv news ,9422219172