Advertisment
जालना जिल्हा

93 पैकी 14 उमेदवारांना लागणार पोलीस कॉन्स्टेबल पदाची लॉटरी

जालना- पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापनेवर असलेल्या 14 पोलीस कॉन्स्टेबल च्या पदांसाठी मागील महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 93 उमेदवारांमधून 14 उमेदवारांना ही नोकरी मिळणार आहे.

मागील महिन्यामध्ये या चौदा रिक्त पदांसाठी सुमारे 1900 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. त्यापैकी 159 उमेदवारांना आज मैदानी चाचणीसाठी निमंत्रित केले गेले, आणि आले 127 त्या मधूनही 34 उमेदवार अन्य काही चाचण्यांमध्ये अपात्र ठरले. उरलेल्या 93 उमेदवारांमधून आता 14 उमेदवारांची निवड ही मैदानी चाचणी मधून केली जाणार आहे. त्यामुळे या 14 उमेदवारांना पोलीस कॉन्स्टेबल पदाची लॉटरीच लागणार आहे.

आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या मैदानी चाचण्या पार पडल्या. त्यामध्ये धावण्याची स्पर्धा ,उंची, गोळा फेक, लांब उडी, अशा विविध चाचण्या होत्या. त्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख पोलीस निरीक्षक संजय व्यास आणि त्यांच्या मदतीला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button