Advertisment
राज्य

सरसंघचालक मोहन भागवत चार तास जालन्यात

जालना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे आज चार तास जालन्यात होते. हिंगोली हुन औरंगाबाद कडे जात असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांचे जालन्यात आगमन झाले. बडी सडक वरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक नितीन खंडेलवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी भोजन करून आरामही केला. दरम्यान भागवत यांची ही भेट घरगुती असून भोजन आणि विश्रांती करण्यासाठी ते थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही कार्यक्रम किंवा कार्यकर्ते तिकडे फिरकले नाहीत.

श्री भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे बडी सडक वर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राम मंदिर पासून शनी मंदिर पर्यंतचा रस्ता पूर्णता बंद करून तो इतरत्र वळविण्यात आला आहे. संघचालक आणि सोबत असलेल्या सुरक्षा यंत्रणा सोबतच जालना पोलीस दलातील सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर ,तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग ,आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. या सर्व दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालना हद्दीत नाव्हा गावापासून ते राममंदिर बडी सडक पर्यंत वाहतूक व्यवस्था कडक करण्यात आली होती .

-दिलीप पोहनेरकर,9422219172
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button