राज्य
सरकार पाकिस्तानची औलाद-आ.नारायण कुचे

जालना- सरकार जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसेल तर, ती छत्रपतिंची नाही तर पाकिस्तान ची औलाद आहे. असं जाहीर वक्तव्य बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी केले.
बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी सर्कल आणि भोकरदन तालुक्यातील राजुर सर्कल मधील काही गावांना अतिवृष्टीच्या अनुदानापासून वगळण्यात आले आहे .या पार्श्वभूमीवर आज मोती बागेपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोरून पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा अंबड चौफुली येथेच पोलिसांनी अडवला आणि त्यानंतर झालेल्या भाषणबाजी मध्ये आमदार कुचे यांनी हे वक्तव्य केलं.
-दिलीप पोहनेरकर,9422219172
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com