10 मंगळसुत्र चोरणाऱ्या आरोपीकडून साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना-शहरामधील विविध भागात फिरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे.त्याच्याकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जालना शहरात गेल्या कांही महिन्यात मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.त्या अनुषणगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस जाळे टाकत होत.हे करत असतांनाच या शाखेचे पोलीस सचिन चौधरी आणि कुष्णा तंगे हे दि.९ रोजी नूतन वसाहत भगत गस्त घालत होते.मागील चोरीच्या घटनांचा अभ्यास केलेला असल्यामुळे चोरट्याची चोरी करण्याची पद्धत एकच असल्यामुळे या एकाच चोराने सर्व चोऱ्या केल्या असाव्यात असा संशय पोलिसांना होता.त्या नुसार या दोघांनी नूतन वसाहत मध्ये एका संशयीत आरोपीला अडवले,आणि त्याला पकडून विचारपूस केली .
त्याने त्याचे नाव शेख सलीम शेख अफजल वय 52, रा.कासीमवरीनगर,पाडेगाव,जि. औरंगाबाद सध्या सैलानी ता.चिखली येथे रहात असल्याचे सांगितले. त्याला विश्वासात घेऊ चौकशी केली असता त्याने जालना शहरातील विविध भागातून दहा महिलांचे मंगळसूत्र चोरल्याचे कबूल केले आणि ते पोलिसांच्याही स्वाधीन केले आहेत .असे सुमारे सात लाख 95 हजाराचे 195 ग्राम सोन्याचे दागिने आणि चोरीमध्ये वापरलेली एक 50 हजार रुपयांची पल्सर दुचाकी असा एकूण आठ लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली .
-दिलीप पोहनेरकर,9422219172
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk