Advertisment
राज्य

कंगना राणावत चा पद्मश्री पुरस्कार परत घ्याआणी गुन्हा दाखल करा-आ. गोरंट्याल

जालना- प्रसिद्ध आणि वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. शासनाने तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा आणि तिच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जालना शहरात दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे प्रभारी रामकिसन ओझा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल, आदींची उपस्थिती होती उपस्थित होती. नागरिकांना शुभेच्छा देतानाच आ. कैलास गोरंट्याल यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या देशाबद्दल अपमानास्पद अपशब्द वापरले आहेत. पूर्वजांनी रक्ताचं पाणी करून स्वातंत्र्य मिळविल्यानंतर  या सर्वांचा कंगना राणावत हिने अपमान केला आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले असल्याचे सांगितले आहे. तिच्या या बेताल वक्तव्याबद्दल शासनाने तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार वापस घ्यावा अशी मागणी आमदार गोरंट्याल यांनी केली . उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी कंगनावर  गुन्हा दाखल करावा अशा सूचनाही दिली.  हा गुन्हा दाखल करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

-दिलीप पोहनेरकर,9422219172
डाउनलोड https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button