राज्य

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा सुरू; विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

जालना- महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन च्या आधिपत्याखाली आणि जालना जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९व्या राज्यस्तरीय ज्युनियर तलवारबाजी अजिंक्य स्पर्धेला आज शनिवार दिनांक 13 तारखेपासून सुरुवात झाली. आणखी दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे पंधरा तारखेला या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

आज पासून सुरु झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले.

* तलवारबाजी विषयी*
1896 ला ऑलम्पिक मध्ये पहिल्यांदा हा खेळ खेळला गेला .खरेतर तलवारबाजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य कालापासून चालत आलेला सराव आहे. मात्र ऑलम्पिक मध्ये तो खेळला गेल्यामुळे त्याला खेळाचे स्वरूप आले आहे. शासन मान्य हा खेळ आहे. मात्र याला मिळणारे गुण हे शैक्षणिक पात्रतेत धरायची किंवा नाही हे पूर्णता शासनावर अवलंबून आहे. तीन स्तरावर हा खेळ खेळला जातो. आज पहिल्या स्तरावरचा चोवीस संघांनी हा खेळ खेळला. जिल्हा क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये हा खेळ सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुला आहे. विशेष करून मराठवाड्यासारख्या मागास असलेल्या भागांमध्ये या स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे जालन्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणीच आहे .तलवारबाजी मुळे स्वसंरक्षण करण्यासाठी मदत होते, तसेच एकाग्रताही वाढते एवढेच नव्हे तर या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवायची असेल तर ऑलम्पिक पर्यंत देखील पोहोचता येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खेळाकडे आकर्षित झाले पाहिजे असेही संयोजक आणि स्पर्धकांनी आवाहन केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुहासिनी देशमुख यांच्यासह विविध संस्थाचालक झटत आहेत.

-दिलीप पोहनेरकर,9422219172
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

Related Articles