जालना जिल्हा

रुपनगरमध्ये नवीन मतदार नाव नोंदणी सुरू; अमोल ठाकूर मित्र मंडळाचा उपक्रम

जालना: आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक 29 मधील अमोल ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने मोफत नवीन मतदार नाव नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.  माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते  रुपनगर येथे या अभियानाला प्रारंभ झाला आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर,युवासेना राज्यविस्तारक अभिमन्यु खोतकर,नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुलें,आत्मानंद भक्त,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष विभावरी ताकट,पंडित भुतेकर, संतोष मोहिते, श्री बायस ,अमित ठाकुर,अमोल ठाकुर,विनया ठाकुर,शुभम ठाकुर, श्री मगरे , श्री उघडे ,मनोज ठाकुर, श्री वाघमारे , सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकुर, किशोर ताजी,गजानन गिनगीने,अमृत कोकाटे आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 29 मधील नागरिकांसाठी अमोल ठाकूर मित्र मंडळाने हे अभियान सुरू केले आहे. ज्या युवक युवतीचे अठरा वर्ष पूर्ण झालेले अशा नवं मतदारांची या अभियानात नाव नोंदणी करून त्यांना मतदान कार्ड देण्यात येणार आहे. तसेच अठरा वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही, तसेच मतदान कार्ड नाही अशा सर्वांचे मतदान यादीत नाव नोंदणी करून त्यांना निवडणूक विभागाच्या मदतीने  मतदान कार्ड उपलब्ध करून देण्याचा प्रयन्त या अभियानातून करण्यात येणार आहे.

लोकशाहीत मतदान अधिकार पवित्र मानल्या जातो.  सर्वांनी हा अधिकार बजावून लोकशाही मजबूत केली पाहिजे. मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी अमोल ठाकूर मित्र मंडळाने हाती घेतलेल्या या अभियानाचे अर्जुन खोतकर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रभागातील सर्व नवं मतदारांनी या अभियानात सहभागी होऊन आपली मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास प्रभागातील वरिष्ठ नागरिक, नवं मतदार व महिलांसह अमोल ठाकूर मित्र मंडळाचे सदस्य संतोष सोसे,श्रीकांत काळे,करण ताजी,सुरेंद्र जाधव,सचिन डोईफोडे, किरण कोकाटे,विशाल ढवळे,पदम ताजी,देशपांडे,विक्रम राजपुत, भरत कुसुंदल,श्याम पवार,सौरभ ठाकुर,संजय खरात,श्रीधर उघडे,करण बायस,अभिजीत ठाकुर,बालाजी पवार,नितीन वानखेडे,गजानन गिराम,अजय कदम,योगेश रत्नपारखे, सागर पाटील,विक्रम कुसुंदल,यांची  उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर,
9422219172,डाउनलोड करा
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button