न्याया पासून कोणीही वंचित राहू नये- न्या. सुवर्णा केवले

जालना-शासनाच्या नवीन- नवीन आणि बदललेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उद्देश आहे. त्यासोबत न्यायापासून कोणी वंचित राहू नये हेदेखील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लक्षात घेतले पाहिजे. असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांनी व्यक्त केले.
रविवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विविध योजनांचा समारोप आज करण्यात आला. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल, अप्पर पोलीस अधिक्षक( गृह) संजय व्यास, आणि वकील संघाचे अध्यक्ष संजय देशपांडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना न्यायमूर्ती केवले म्हणाल्या, सरकारचा आणि उच्च न्यायालयाचा ग्रामीण भागात पर्यंत पोहोचण्याचा उद्देश हा अत्यंत महत्वाचा आहे. तिऱ्हाईत माणसाचे दुःख काय आहे हे समजून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायाधीशांना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाठविले आहे आणि या माध्यमातून समाजाचे दुःख अडीअडचणी समजावून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. त्याच सोबत न्यायापासून कोणी वंचित राहू नये याकडेही लक्ष दिले जाणार आहे आणि म्हणूनच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची व्याप्ती आता वाढली आहे.
उच्च न्यायालयाने त्यांची जबाबदारीदेखील वाढविली आहे.
दरम्यान पंधरा दिवसाच्या कार्यकाला मध्ये न्यायाधीशांनी ग्रामीण भागात जाऊन न्यायनिवाडा केला.तो करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. न्यायाधीशांना जर अशा अडचणी असतील तर सामान्य माणसांना किती असतील याची जाणीव देखील न्यायालयाला आहे. या अडचणी येऊ नयेत म्हणून संबंधित यंत्रणा देखील प्रयत्न करीत असतातच, मात्र आता त्यामध्ये गती देण्याची गरज असल्याचे मत न्यायमूर्ती सुवर्णा केवले यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी देखील यावेळी त्यांच्या योजना न्यायाधीशांसमोर मांडल्या, जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली, covid-19 च्या काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कसा लढा दिला, आणि भविष्यात काय नियोजन आहे याविषयीचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल यांनी व्यासपीठाचा समोर ठेवला, तर वकील संघाची भूमिका संजय देशपांडे यांनी स्पष्ट केली.
दरम्यान या कार्यक्रमाला न्या. नरेंद्र प्रधान, न्या. अनिरुद्ध टिकले,न्या. ए. एस. राजंदेकर, न्या. मृणाल डोईफोडे, न्या. माधुरी कुलकर्णी. न्या. व्ही. जी. रघुवंशी, न्या. एस .एस. पल्लोड ,न्या. एम. बी. ओझा. आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्या. हुमा अन्सारी आणि न्या. कांचन झंवर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेणुकादास पारवेकर यांनी मानले. -दिलीप पोहनेरकर,
9422219172,डाउनलोड
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk